पंढरपूर :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आज पंढरीत अभूतपूर्व बंद पाळण्यात आला. सर्व जनता घरात
असताना पोलीस कर्मचारी मात्र चौकाचौकात आपली सेवा बजावित होते. अशा पोलिसांना भेटून आमदार प्रशांत परिचारक यांनी विचारपूस करीत जेवणाची सोय केली. तसेच बंद काळात फिरणाऱ्या नागरिकांना देखील घरीच बसण्याची सूचना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी  “जनता कर्फ्यु आवाहन केले होते. त्याला पंढरपूरकरांनी मोठा
प्रतिसाद दिला. अवघे पंढरपूर दिवसभर बंद होते. या काळात आमदार प्रशांत परिचारक यांनी सर्वत्र फिरून पाहणी केली. रस्त्यावर फिरणाऱ्या तुरळक दुचाकीस्वारांना घरातच बसण्याची विनंती केली. तसेच चौकात चौकात सुरक्षेसाठी उभ्या असणाऱ्या पोलीस बांधवांपाशी थांबून कोणती अडचण आहे काय?
याची चौकशी केली. आज सर्व दुकाने, हॉटेल बंद असल्याने या पोलीस कर्मचाऱ्यांना चहा देखील मिळाला नव्हता. याची दखल घेवून त्यांनी तातडीने त्या त्या भागातील नगरसेवक, कार्यकर्ते यांना पोलिसांना चहा-नाष्टा देण्याची सूचना केली.
दरम्यान शिवाजी चौक येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांच्याबरोबर चर्चा करीत असताना एक तरूण आपल्या मुलीला घेवून आला. त्याने आमदार परिचारक यांना माझ्या मुलीच्या कानात सकाळी खडा गेल्याने तीला त्रास होत असल्याचे सांगितले. सर्व दवाखाने फिरलो परंतु ते बंद
असल्याची माहिती त्यांनी दिली. आमदार परिचारक यांनी तातडीने कानाचे तज्ज्ञ डॉ.खटावकर यांना दूरध्वनी करून सदर मुलीवर उपचार करावेत अशी विनंती केली. तसेच सदर युवकाला दवाखाना दाखविण्याची सोय देखील केली. यामुळे बंद काळात देखील पोलिसांसह सामान्यांना आमदार प्रशांत
परिचारक यांनी मोठा आधार दिल्याने समाधान व्यक्त होत आहे.

 
  