महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना 'बिझनेस आयकॉन ऑफ द इअर' महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्कार

0

 


महाराष्ट्र राज्य उद्योजक बिझनेस आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांचा सन्मान...

पुणे प्रतिनिधी --पुणे येथील काकडे पॅलेस या सभागृहामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांना 'बिझनेस आयकॉन ऑफ द इअर' महाराष्ट्र राज्य उद्योजक गौरव पुरस्काराने जेष्ठ सिने अभिनेत्री वर्षाताई उसगांवकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

 यावेळी बोलताना अभिनेत्री वर्षाताई उसगावकर  म्हणाल्या की अतिशय कष्टाने आणि जिद्दीने दिलीप बापू धोत्रे यांनी पंढरपूर येथे पंचतारांकित  हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी, हॉटेल श्रीयश, पुणे येथे हॉटेल साक्षी, पंढरपूर येथे हिंदुस्तान ट्रॅक्टरचे ग्रँड ट्रॅक्टरची डीलरशिप, हिंदुस्तान पेट्रोलियमचे पेट्रोल पंप, विठाई अर्बन निधी बँक, डीडी इन्फ्रा,  डीडी कन्स्ट्रक्शन, मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज या विविध व्यवसायाची निर्मिती केली असून शेकडो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

अतिशय सामान्य कुटुंबातून येऊन दिलीप धोत्रे यांनी स्वतःच्या कष्टाने आणि ताकदीवर वेगवेगळे व्यवसाय सुरू केले त्याबद्दल  मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करते असे हे गौरव उदगार  वर्षाताई उसगावकर यांनी यावेळी काढले.मनसे नेते दिलीप बापु धोत्रे यांनी समाजातील गरजू लोकांसाठी खुप असं काम केले आहे तसेच राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत. म्हणजे त्यांनी महिलांसाठी उद्योगास चालना देण्यासाठी विशेष काम केले आहे.अशा सामाजिक व राजकीय शैक्षणिक, साहित्यिक, वैद्यकीय, क्रीडा क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.त्यांना महाराष्ट्र राज्य उद्योजक बिझनेस आयकॉन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मान केल्यामुळे 

त्याचां कार्याचे कौतुक होत आहे सदर कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)