अ‍ॅड. संदिप कागदे यांचे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी येथे "कायदा आणि समृद्ध युवा" ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

0

प्रतिनिधी पंढरपूर -कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी शेळवे ता.पंढरपूर येथे मुंबई उच्च न्यायालय येथे प्रॅक्टिस करणारे अ‍ॅड. संदिप कागदे यांचे "कायदा व समृद्ध युवा" या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या सर्वागीण 
विकासाच्या दृष्टीकोनातून प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 

ह्यावेळी कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली. अ‍ॅड. संदिप कागदे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राध्यापक नागेश तिवारी यांच्या हस्ते करण्यात आला. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक जगदीश मुडेगावकर यांनी अ‍ॅड. संदिप कागदे यांचा परिचय करून दिला

अ‍ॅड. संदिप कागदे हे उच्च शिक्षित असून त्यांचे शिक्षण बी.एस. सी.,एल.एल.एम.,सेट, नेट (B.Sc.,L.L.M.,S.E.T.,N.E.T) आहे. नुकताच त्यांना विधीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल व महत्वपूर्ण योगदान दिल्या बद्दल विश्वभूषण डॉ. बाबा साहेब आंबेडकर प्रतिष्ठान पंढरपूर यांच्या वतीने "विधिज्ञ राज्यस्तरीय पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले आहे. सत्र न्यायालय व मुंबई उच्च न्यायालय येथे विविध प्रकारच्या फौजदारी केसेस चालवण्याचा अनुभव आहे. कायदा, शिक्षण आणि युवा सक्षमीकरण ह्या मध्ये त्याचे कार्य उल्लेखनीय आहे.

त्या नंतर अ‍ॅड. संदिप कागदे यांनी कायदे विषयक विविध विषयावर अभ्यासपूर्ण व सखोल असे मार्गदर्शन विध्यार्थ्यांना केले. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय राज्य घटना ,भारतीय न्यायव्यवस्थेची रचना ,नागरिकांचे मुलभूत अधिकार, नागरिकांची मुलभूत कर्तव्य  ,जनहित याचिका , फोजदारी कायदे ,अटकपूर्व जामीन , शैक्षणिक कायदे ह्या विषयावर मार्गदर्शन केले.

त्याच बरोबर जिद्द ,चिकाटी ,सातत्य ,परिश्रम ह्याच्या जोरावर आयुष्यात खूप मोठे यश संपादन करता येते असे मत  
 अ‍ॅड. संदिप कागदे यांनी व्यक्त केले. त्याच बरोबर स्वामी विवेकानंदाच्या संकल्पनेतील युवक तसेच समाज व राष्ट्र बळकटी करणामध्ये युवकांची महत्वाची भूमिका ह्या विषयी मार्गदर्शन केले . प्राध्यापक अभिनंदन देशमाने यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रध्यापक कुबेर ढोपे यांनी केले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजिस्ट्रर श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ  तसेच विभागप्रमुख प्रा. डॉ. एस एम लंबे , डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा.अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, अ‍ॅड. सागर पाटील तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)