पंढरपूर :श्री. रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व जुनिअर कॉलेज पंढरपूर या प्रशालेचा चि. तन्मय सूर्यकांत कदम याने पंढरपूर तालुकास्तरीय फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या यशाबद्दल संस्था सचिवा सौ. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांनी चि. तन्मय कदम यांचे व क्रीडा शिक्षिका यांचे श्रीफळ ,शाल देऊन व पेढा भरवून कौतुक केले.
प्रशालेचे क्रीडा शिक्षिका सुप्रिया मोटे,कुमुदिनी सरदार. यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल चिं तन्मय चे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी प्राचार्य नंदिनी गायकवाड. इरफान शेख. यांचेसह पालक वर्ग उपस्थित होता.


