पंढरपूर विकास आराखडा: मालमत्ताधारकांनी सर्व्हेक्षणास सहकार्य करावे प्रशासनाचे आवाहन

0

 

* 12 पथकाव्दारे प्राथमिक सर्व्हेक्षण, पथकात वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी व नगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश * सुमारे 630 मालमत्ताधारकांची घेण्यात येणार माहिती 

    पंढरपूर (दि.08):-  श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो आणि दररोज मोठ्या संख्येने भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी पंढरपूर विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक  सर्व्हेक्षण करण्यात येत असून, 12 पथकाव्दारे मालमत्तांचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. संबधित मालमत्ताधारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास  योग्य माहिती देवून सहकार्य करावे असे आवाहन   प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.



पंढरपूर विकास आराखडा 

माहिती देणाऱ्याची संख्या      -145 

माहिती न देणाऱ्यांची संख्या    -54

एकूण.    199               

                  पंढरपूर येथील विकास आराखड्याबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी विक्रेते, महाराज मंडळी यांच्याशी प्राथमिक चर्चा करून समस्या जाणून घेण्यासाठी केबीपी कॉलेज, पंढरपूर येथे दि. 01 मे व 02 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कुमार  आशीर्वाद यांनी चर्चा केली होती.  त्याअनुषंगाने प्राथमिक सर्व्हे आज गुरुवार दि. 8 मे 2025 पासून सुरु करण्यात आला आहे. सदर सर्व्हे 12 पथकाव्दारे करण्यात येत असून, या पथकात केबीपी कॉलजचे वरीष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी, पंढरपूर नगरपालिकेचे अधिकारी- कर्मचारी यांचा समावेश आहे.  सदरचे सर्व्हेक्षण प्राथमिक असून, 630 मालमत्ताधारकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणामुळे बाधित नागरिकांचे सामाजिक, आर्थिक परिणामांची माहिती  गोळा होणार असल्याने, विकास आराखड्याची व्याप्ती लक्षात घेवून संबधितांना विश्वासात घेवून द्यावयाची भरपाई व पुनर्वसन याबाबत प्रस्ताव तयार करण्यात येणार येईल. बाधितांची कमीत कमी जागा घेऊन जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याबाबतही प्रयत्न करण्यात येणार आहे.

 पंढरपूर विकास आराखड्यातील बाधितांची सर्व्हे पथकाकडून संबधित  मालमत्ता धारकांचे नांव, वय, जातीचा प्रवर्ग,  व्यवसाय, जागेचे क्षेत्रफळ, नगर भूमापन क्रमांक,  मिळकत पत्र, भाडेकरुचे नांव, कुळ,  बाधित जागेचे मंदिरापासून अंदाजे अंतर,  महत्वाच्या रस्तत्यापासून असलेले अंतर,  बाधित जागेची दर्शनी बाजू, बांधकामाचे वर्णन व प्रकार, जागा कोणत्या कारणासाठी वापरात आहे. व्यवसायासाठी असाणाऱ्या जागेचा कधीपासून वापर करण्यात येत आहे. प्रमुख चार वाऱ्यांमध्ये  व्यावसायिक वापरांतून होणारे अंदाजे उत्पन्न, संपादनामुळे बाधित होणारे उत्पन्न,  पुनर्वसनाचा लाभ अपेक्षित आहे का?  पुनर्वसनासाठी पसंतीचे ठिकाणे, मालमत्तेच्या अनुषंगाने मालक आणि भाडेकरु तसेच कूळ यांच्यामध्ये जागेबाबत वाद आहे का?  मालमत्तेवर कर्ज गहाणखत  बोजा, पुर्नवसन दरम्यान तात्पुरत्या घरांची गरज तसेच पुनर्वसन प्रक्रियेबाबत सुचना व अभिप्राय आदीबाबत माहिती  सर्व्हेक्षण पथकाकडून गोळा करण्यात येणार आहे.  


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)