पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका रद्द

0

 पंढरपूर - पंढरपूर शहरातील आरोग्यवस्था कर व पार्किंग कर वसुली करिता निर्मला ऑटो केअर सेंटर अहमदनगर या कंपनीला  ठेका देण्यात आलेला होता दिनांक 5/5/2025 रोजी संध्याकाळी गजानन महाराज मठ मागील रस्त्यावर  कंपनीमार्फत नियुक्त कर्मचारी यांच्याकडून नाशिक विभागातील भाविक पंढरपूर मध्ये दर्शनासाठी आलेले असताना त्या भाविकांशी  गैरवर्तन केल्याचे फेसबुक वर लाईव्ह व्हिडिओ प्रसारित झाला होता.

     याची दखल घेत नगर परिषदेने निर्मला ऑटो केअर सेंटर अहमदनगर यांचा आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर वसुलीचा ठेका दिनांक 8 मे 2025 पासून रद्द  केला आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी यापुढे कोणत्याही व्यक्तीस आरोग्य व्यवस्था कर व पार्किंग कर देऊ नये तसे निदर्शनास आल्यास त्वरित नगर परिषदेची संपर्क साधावा

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)