सोलापूर जिल्हयातील दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित असणारे अनुदान तात्काळ जमा करावे. चेअरमन, कल्याणराव काळे

0

पंढरपूर - सोलापूर जिल्हयातील दुध पुरवठा करणाऱ्या व दुध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदान जमा व्हावे अशी मागणी सहकार शिरोमणीचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे, कुर्मदास सह. साखर कारखान्याचे चेअरमन दादा साठे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांचेकडे केली यावेळी तात्काळ निवेदनाची दखल घेत मा. दुग्ध विकास आयुकत सो, यांना दुरध्वनीवरुन सबंधीत विभागास प्रलंबित शेतकऱ्यांचे अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आले.

राज्यातील सहकारी व खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महायुती सरकारने दूध उत्पादक शेकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ व 7 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मागील काही महिन्यापासून पावडर प्लांटचे अनुदान जमा झाले होते पंरतू दुधाचे अनुदान जमा झालेले नाही त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत तरी त्यांचे अनुदान जमा व्हावेत असे निवेदनात काळे यांनी म्हटले आहे.

  शेतकऱ्यांचे प्रश्नासाठी कायम तत्पर राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी डायरेक्ट फोन करुन दुध अनुदान लवकर जमा करण्याचे मा. आयुक्त सो, यांना सुचना दिल्याने दुध उत्पादक शेतकरी यांचे मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)