वृत्तपत्र विक्रेता संघटना जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्री बंद ठेवून गुढीपाडव्या दिवशी काळीगुढी साजरी करणार......

0

 पंढरपूर - वृत्तपत्र विक्रेता संघटना ही गेली अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी, याकरता जिल्ह्यातील वृत्तपत्र प्रशासनातील महत्त्वाच्या व्यक्तीशी पत्रव्यवहार करत होती/ केला आहे परंतु त्याची म्हणावी तशी दखल वृत्तपत्र प्रशासनात असलेल्या जबाबदार व्यक्तींनी न घेतल्याने प्रमुख मागणी आहे ती आधारभूत किंमत सात रुपये ठेवून त्यावर दोन रुपये दहा पैसे कमिशन मिळावे हे कमिशन शहरी वृत्तपत्र विक्रेता व ग्रामीण वृत्तपत्र विक्रेता असा कोणताही भेदभाव न करता सरसकट दोन रुपये दहा पैसे कमिशन मिळावे या प्रमुख मागण्याचे निवेदन जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या वृत्तपत्र विक्रेता संघटनेने वृत्तपत्र प्रशासनाला लेखी निवेदने दिले असून याची दखल न घेतल्याने येत्या पाडव्याच्या दिवशी दिनांक 30 मार्च रोजी संपूर्ण जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्रेते एक दिवसाचा बंद पाळणार आहेत तशी लेखी निवेदनात नमूद करण्यात आले असल्याचे वृत्तपत्र विक्रेता संघटनाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंगप्पा मेढेकर जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे राज्य सदस्य गोरख भिलारे शहर संघटक महेश पटवर्धन जिल्हा सदस्य सावंत यांना दिली.

     वरचेवर वाढणारी महागाई यामुळे वृत्तपत्र विक्रेता अडचणीत आला असून आपल्या कमिशनमध्ये अल्प  वाढ करावी याकरता गेले अनेक दिवसापासून जिल्हा वृत्तपत्र प्रशासनातील संबंधित जबाबदार व्यक्तींना लेखी निवेदने देऊनही त्यांच्याकडून अद्यापही कोणता सकारात्मक निर्णय न आल्याने रविवारी पंढरपूर येथील शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या बोलावण्यात आलेल्या बैठकीत चर्चा होऊन जर वृत्तपत्र प्रशासनाने निवेदनाची दखल घेतली नाही तर जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते हे जिल्ह्यातील वृत्तपत्र विक्री बंद ठेवून गुढीपाडव्या दिवशी काळीगुढी साजरी करतील याकरता वृत्तपत्र प्रशासनातील जबाबदार व्यक्ती अधिकाऱ्याने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी वृत्तपत्र संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

     वृत्तपत्र प्रशासनातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे यामध्ये वृत्तपत्र विक्रेता एजंट यांचे कडून अंकापोटी जे डिपॉझिट घेतले जाते ते डिपॉझिट बिनव्याजी असून त्यावर किमान बँक रेट प्रमाणे तरी एजंट  व्याज मिळावे तसेच जाहिरात पुरस्कृत पुरवणीचे एक रुपया प्रमाणे चार्जेस मिळावे वर्षाखेरीस वृत्तपत्रात दिनदर्शिका दिली जाते त्या दिनदर्शिकेचे हाताळणी चार्जेस सर्व एजंट व विक्रेते बंधूंना तीन रुपये मिळावेत शिवाय विजयादशमी अर्थात दसऱ्याला सुट्टी जाहीर करावी आदी मागण्यात निवेदनात नमूद केले आहेत. या मागण्याचा विचार तसेच दोन रुपये दहा पैसे कमिशन मिळावे ही मागणी असून त्याचा विचार न केल्याने व वृत्तपत्र प्रशासनातील अधिकाऱ्याने कोणतीच भूमिका स्पष्ट न केल्यामुळे त्याचा निषेध म्हणून पाडव्याच्या शुभ दिनी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेते एक दिवसाचा बंद पाहणार आहेत याची जबाबदारी पूर्णपणे जिल्ह्यातील वृत्तपत्र प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांची असेल असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे तरी वृत्तपत्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा विचार करून वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय द्यावा अशी जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्याची भावना आहे .




टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)