पंढरपूर - पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवार दि.११/०३/२०२५ रोजी बेदाणा शेतीमालाची रू.५११/- प्रति किलो या उच्चांकी दराने विकी झाली. बेदाण्याला रू.५० ते रू.५११/- व सरासरी २००/- प्रति किलो दर निघाला. बेदाण्याची सुमारे १७५ गाडीची आवक होवून बेदाणा १५० गाडीची विक्री झाली. बेदाणा आवक चांगली असुन खरेदीदार व्यापारी मोठया संख्येने येत आहेत. तसेच दि.११/०३/२०२५ रोजी पार्श्वनाथ ट्रेडर्स प्रो. स्वप्नील कोठाडिया यांचे आडत दुकानी श्री. आकाश धनाजी वसेकर रा. बार्डी ता. पंढरपूर. यांच्या ३३ बॉक्स बेदाण्यास रू.५११/- प्रती किलो उच्चांकी दर मिळाला सदर माल मे. राजेश्वरी ट्रेडींग कंपनी, तासगांव यांनी उच्चांकी दराने खरेदी केला. तसेच मे. श्री. सोमनाथ सदाशिव डोंबे यांचे आडत दुकानी श्री. सोमनाथ महादेव गोरे रा. कोन्हेरी ता. मोहोळ यांच्या १० बॉक्स बेदाण्यास रू.५००/- प्रती किलो दर मिळाला सदर माल मे. रोहिणी ट्रेडींग कंपनी सांगली यांनी खरेदी केला, मे/श्री. तुलसी ट्रेडींग कंपनी यांचे आडत दुकानी श्री. लक्ष्मण दासु व्यवहारे रा. करकंब यांच्या १९ बॉक्स बेदाण्यास रू.४२१/- प्रती किलो दर मिळाला सदर माल मे.एस. मनिलाल कंपनी, तासगांव यांनी खरेदी केला, मे/श्री. बसंतराज ट्रेडर्स यांचे आडत दुकानी श्री. नामदेव विठ्ठल मोरे रा. बावी ता. माढा यांच्या ७५ बॉक्स बेदाण्यास रू.४००/- प्रती किलो दर मिळाला सदर माल मे. एम. सारडा, सांगली यांनी खरेदी केला अशी माहिती बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती मा.श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे यांनी दिली.
शेतकरी श्री. आकाश धनाजी वसेकर रा. बार्डी व आडते श्री. स्वप्नील कोठाडिया, यांचे बाजार समितीचे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड साहेब यांनी व युटोपियन शुगर्सचे चेअरमन मा.श्री. उमेशराव परिचारक साहेब यांनी समक्ष बेदाणा मालाची पहाणी करून शेतकरी व आडते, व्यापारी यांचे कौतुक केले.
पंढरपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बेदाण्याचे सौदे दर मंगळवार व शनिवार रोजी दुपारी १ वा. असतात. मालाला उठाव व मागणी चांगली आहे. व्यापारी मोठ्या प्रमाणावर माल खरेदीसाठी येत आहेत. आवक चांगली असुन, दर चांगला मिळत असल्याने शेतकरी माल विक्रीसाठी पंढरपूर बाजार समितीस प्राधान्य देत आहेत. शेतकरी बंधुंनी जास्तीत जास्त माल विकी साठी पंढरपूर बाजार समितीमध्ये आणावा. सोलापूर जिल्हयाचे आमदार मा.श्री. प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पंढरपूर बाजार समितीचे कामकाज उत्तम प्रकारे चालु आहे. तसेच बेदाणा सौद्यासाठी युटोपियन शुगर्सचे चेअरमन मा.श्री. उमेशराव परिचारक साहेब यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभते. असे सभापती मा.श्री. हरिषदादा भास्करराव गायकवाड व उपसभापती मा.श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे यांनी सांगीतले. यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक मा.श्री. सोमनाथ डोंबे, मा.श्री. यासीन बागवान, मा.श्री. महादेव लवटे, मा.श्री. महादेव बागल, व अन्य संचालक आडते, व्यापारी, तसेच बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होतें.