राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे निकाली 7 कोटी 42 लाख 5 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल

0

 
                                           

 पंढरपूर (दि.24)-  तालुका विधी सेवा समितीच्यावतीने  जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे  दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 7 कोटी 42 लाख 5 हजार 389 रुपयांची तडजोड झाली असल्याची माहिती  तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.एन.सुरवसे यांनी दिली.

            या लोकअदालतीसाठी एकुण 5 पॅनलची व 1 नियमित न्यायालयाची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये  जिल्हा न्यायाधीश एस बी देसाई, न्यायाधीश ए. ए. खंडाळे,  न्यायाधीश एस एस चोपडा, न्यायाधीश श्रीमती एस.एस.राऊळ, न्यायाधीश  ए एस सोनवकर,  न्यायाधीश श्रीमती ए.एस.साळुंखे यांनी काम पाहिले.

   सदरची लोकअदालत  प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेली होती. त्यासाठी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश श्री. डी. एन. सुरवसे, सह दिवाणी न्यायाधीश ए. ए. खंडाळे यांनी वेळोवेळी बैठका घेवुन, पाठपुरावा करुन संपन्न केली.

या लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)