---------------------------------
पंढरपूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या शहराजवळीलच असणाऱ्या लक्ष्मी - टाकळी ग्रामपंचातीचे विद्यमान उपसरपंच सागर सोनवणे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदी आज दि. 05/02/2025 रोजी उपसरपंचपदाची निवडणूक ग्रामपंचायतीच्या सभागृहात आज रोजी घेण्यात आली .उपसरपंचपदी रुपाली सागर कारंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रूपाली सागर कारंडे यांनी उपसरपंचपदासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज दाखल केला होता तर विरोधी गटाचे सहा सदस्य निवडीच्यावेळी बैठकीला गैरहजर होते .सत्ताधारी परिचारक- साठे गटाचे 11 सदस्य बैठकीस हजर होते , उपसरपंच पदासाठी ग्रा .सदस्या रूपाली कारंडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी जयंत खंडागळे यांनी जाहीर केले. त्यामुळे उपसरपंच पदासाठी विरोधी गटाकडून कोणताही अर्ज आला नसल्याने नूतन उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल रूपाली कारंडे यांचा सत्कार ग्रामपंचायत सदस्या नागरबाई साठे यांच्या शुभहस्ते करण्यात आला . उपसरपंच निवडीच्या सभेच्या वेळी अध्याशी अध्यक्ष म्हणून ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच संजय साठे होते. यावेळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच रूपाली कारंडे म्हणाल्या की, सत्ताधारी परिचारक साठे गटाच्या मार्गदर्शनाखाली माझी उपसरपंचपदी निवड केली त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करून मला दिलेल्या पदाचा जबाबदारीने उपयोग करून मी गावातील सर्वसामान्य व गोरगरीब जनतेची अहो रात्र कामे करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे यावेळी सांगितले, टाकळी ग्रामपंचायत नूतन उपसरपंचपदी रूपाली कारंडे यांची निवड झाल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे नेते व विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक, शिंदे शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश साठे यांनी कारंडे यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी रामदास ढोणे, सरपंच संजय साठे, अभिमन्यू पवार, सरपंच पती सागर कारंडे, दाजी चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्या नागऱाबाई साठे, आशाबाई देवकते, विजयमाला वाळके, रेश्मा साठे, रोहिणी साठे, औदुंबर ढोणे,नंदकुमार वाघमारे, महादेव पवार, सुरेश टिकोरे, अनिल सोनवणे, सुदर्शन थोपटे, सचिन वाळके,मारुती उकरंडे, अंकूश ढोणे, विकास देवकते ,प्रीतम कुलकर्णी विजय उकरंडे, औदुंबर पोतदार, शंकर धोत्रे, गणेश ढोणे, समाधान ढोणे गणेश जाधव नंदू कारंडे इ, ग्रामपंचायतचे सदस्य, ग्रामस्थ ग्रा .कर्मचारी उपस्थित होते.

