अजितदादा पवारसाहेब यांची सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी निवड झालेबददल मुंबई येथील देवगिरी निवास्थानी चेअरमन कल्याणराव काळे यांनी भेट घेवून त्यांचा सत्कार करण्यात आला

0

 


पंढरपूर - महाराष्ट्र राज्याच्या सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांची निवड झालेबददल मुंबई येथील देवगिरी निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी भेट घेवून शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे, राष्ट्रवादीचे युवक नेते संतोष सुळे उपस्थित होते.

 नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका संपन्न झाल्या असून राज्यामध्ये महायुती सरकारचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीत घवघवीत यश संपादन केलेले आहे.  महायुती सरकारने सर्व सामान्य जनतेला केंद्रबिंदु मानुन महाराष्ट्राचा विकास केलेला आहे त्याचीच पोहोच पावती म्हणून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असल्याचे काळे यांनी सांगीतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)