पंढरपूर प्रतिनिधी-- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा बुधवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी शिवप्रेमी चौक आठवडा बाजार सायंकाळी 5 वाजता असल्याची माहिती पत्रकार परिषदेत मनसेचे उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार दिलीप (बापु) यांनी घेतली प्रचारात आघाडी घेतली आहे दिलीप बापु यांनी गावभेट दौरे व व्यक्तिगत गाठीभेटी वर भर दिला असून नागरिकांतून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने दिसत आहे.दिलीप बापुची उमेदवारी ही पहिल्या यादीत फिक्स झाल्यामुळे त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे दिलीप बापु हे मनसेचे राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासु निकटवर्तीय आहेत. त्यांना प्रचार सभाचा मोठा अनुभव असल्यामुळे त्यांनी आपल्या उमेदवारीसाठी नियोजनबध्द व्युहरचना आखली आहे. मनसेची जशी पहिली उमेदवारी जाहीर झाली तशीच पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदार संघात राजसाहेब ठाकरे यांची पहिलीच प्रचारसभा येथे होत आहे.त्यामुळे दिलीप बापु ना मतदार संघातून मोठ्या प्रमाणात साथ मिळत आहे.राज ठाकरे यांची पहिलीच प्रचार सभा येथे होत असल्यामुळे या सभेस प्रचंड गर्दी होणार असल्याचे दिसत आहे.
पत्रकार परिषदेत यांची माहिती देतानाच त्यांनी पत्रकार संपादक यांना भावनिक साद केली ,यावेळेस मला साथ द्या नुसत्या बातम्या छापून मला मदत नको तर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तुमची मदत मला पाहिजे आहे. यासाठी या गरीबीतून वर आलेल्या दिलीप बापुला आमदार होण्यासाठी सर्वोतोपयी मदत करा असे आवाहन केले आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रचारासाठी सोलापूर जिल्ह्यातील पहिली जाहीर सभा मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभेचे आयोजित केली असून या जाहीर सभेस संपूर्ण जिल्ह्यातील मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला, युवक युवती व सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान यावेळी आयोजकांकडुन करण्यात आले.



