** नवरात्र महोत्सव: खंडेमहानवमी विजयादशमी दसरा ** श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.विजयालक्ष्मी पोशाख सह अलंकार परिधान**
पंढरपूर - घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरवात होत आहे. या निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडेमहानवमी विजयादशमी दसरा दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रूक्मिणी मातेस श्री.विजयालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेठया जोड, कंगन जोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेच लहान, मोत्याची कंटी दोन पदरी, मोठ्याची कंठी एक पदरी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ एक पदरी मोठी, बोरमाळ तीन पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडे जोड, लॉकेट इ.
तसेच *रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंचपेटी हिरवी, हातसर जोड, पानाड्याचा हार, मद्रासी कंठा, दशावतारीहार, सोने साडी, मासपट्टा, तुळशीची माळ, शिंदे हार, जडावाचे ताणवाड जोड, चंद्र, सूर्य, बाजीराव गरसोळी, पेटींची बिंदी, खाड्यांच्या पाटल्या जोड, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, रुळझोड, मोठी नथ, कर्ण फुले, सोन्याचा करंडा, छत्रछामर, तोडेजोड, चंद्रहार, इत्यादि अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
*तसेच राधिका मातेस चांदीचे मुकुट, पुतळ्यांची माळ, हायकोल, जवेच्या माळा, लक्ष्मीहार व *सत्यभामादेवीला नक्षी टोप, चिंचपेटी तांबडी, ठुशी नवीन, जवमनी पदक, जवेची माळ, मोहरांची माळ, इत्यादी अलंकार व प्रथा परंपरेप्रमाणे पोशाख परिधान करण्यात आलेले आहेत.तसेच मंदिर समितीच्या अख्त्यातरीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लमादेवी, यमाई-तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपारिक पोषाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.


