थोर भारतीय उद्योगपती स्व. रतनजी टाटा यांना स्वेरीत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी.
पंढरपूर: भारताचे थोर उद्योगपती रतन टाटा यांचे काल दि. ०९/१०/२०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. भारताची आन, बान आणि शान असणार्या रतन टाटा यांच्या निधनाने भारतीय उद्योग जगतात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कितीही मोठे झाले तरी पाय जमिनीवर ठेवून माणसाने कसे जगावे याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे रतन टाटा हे आहेत. त्यांच्या निधनाने उद्योगक्षेत्रात व संपूर्ण भारतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गोपाळपूर, ता. पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या वतीने स्व. रतन टाटा यांना आज भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी सुरुवातीला स्व. रतन टाटा यांच्या प्रतिमेला स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी स्व.रतन टाटा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना स्वेरी अभियांत्रिकीच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर म्हणाले की, 'रतनजी टाटा यांच्या निधनामुळे भारतीय समाजजीवनात व उद्योग जगतात फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर असे दोन्ही काळ अनुभवलेले व भारतीय समाजाच्या उन्नतीमध्ये उद्योगांचे महत्व अधोरेखित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले स्व. रतन टाटा हे बहुधा एकमेव उद्योजक होते.
कोविड काळात स्व. रतनजी टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा उद्योग समूहाने केलेले समाजोपयोगी कार्य भारतीय समाज कधीही विसरू शकणार नाही.' यानंतर दोन मिनिटे शांतता पाळून सर्व उपस्थितांनी स्व. रतन टाटा यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन चार्ज डॉ. एम. एम. पवार, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार, सर्व अधिष्ठाता, सर्व विभागप्रमुख, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, पालक व विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
[7:19 PM, 10/10/2024] Halkude: छायाचित्र:


