श्री विठ्ठलाच्या नगरीत भक्ती सागर येथे अडीच ते तीन लाख वारकरी राहतात अशा ६५ एकर भक्ती सागर येथे वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने ५०१ झाडे लावण्याचा संकल्प
पंढरपूर नगरपरिषद, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती व वृक्ष प्रेमी ग्रुपच्या वतीने ६५ एकर भक्ती सागर येथे ह भ प शिवाजीराव मोरे महाराज व मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे
वृक्षप्रेमी ग्रुपच्या वतीने पंढरपूर शहरांमध्ये भक्तिमार्ग, गौतम विद्यालय ते गोपाळपूर रोड दर्शन बारी मार्ग, श्री संत गाडगेबाबा चौक ते गजानन महाराज मठ, माजी आमदार भाई राऊळ पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ,जुने एसटी स्टँड , एकता नगर, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास शेजारील ओपन स्पेस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, पोलिस कॉलनी, शिव पार्वती नगर टाकळी रोड, तिरंगा नगर ओपन स्पेस,शासकीय वसाहत गणेश मंदिर ओपन स्पेस,विठ्ठल नगर,३२ खोल्या महापूर चाळ झोपडपट्टी, थोरली तालीम, धोंडोपंत दादाच्या मठा शेजारी, श्री संत तुकाराम महाराज मंदिर ते कालिका देवी चौक, प्रदिक्षणा मार्ग, भाई भाई चौक, गुजराती कॉलनी समोर व इतर ठिकाणी ५०१ झाडे लावून वृक्षारोपण केले आहे
आता यात्रा कालावधीमध्ये ज्या ६५ एकर भक्ती सागर या ठिकाणी लाखो भाविक वास्तव्यासाठी असतात त्या ठिकाणी वारकऱ्यांना झाडाचा निवारा मिळावा म्हणून ६५ एकर भक्ती सागर मध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करणार आहोत त्याची आज सुरुवात करण्यात आली आज वृक्षप्रेमी मंडळींनी ६० झाडे लावून याची सूरवात केली व आदरणीय शिवाजीराव मोरे महाराज व मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ५०१ झाडे ६५ एकर भक्ती सागर परिसरामध्ये लावण्याचा संकल्प आज करण्यात आला आहे
हरित पंढरपूर सुंदर पंढरपूर करण्याचे हे सर्व कार्य केवळ आपल्या वृक्षप्रेमी ग्रुप मुळे होत आहे आपले हे कार्य असेच निरंतर सुरू ठेवूया आणि खऱ्या अर्थाने पांडुरंगाची सेवा व येणाऱ्या भाविकांची सेवा आपल्या हातून घडण्यासाठी बळ पांडुरंगाने आपल्याला द्यावं हीच अपेक्षा




