मातोश्री ईश्वराम्माच्या सुयश भोसले ची " स्केटिंग " स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड......
पंढरपूर.. श्री. रुक्मिणी विद्यापीठ संचलित मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूरचा सुयश उमाकांत भोसले. या विद्यार्थ्यांची दयानंद कॉलेज सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले व त्याची विभागीय स्तरावर निवड झाल्याने संस्था सचिवा मा.सौ. सुनेत्राताई पवार व संस्था मार्गदर्शक मा.श्री. विजयसिंह पवार यांनी चि.सुयश उमाकांत भोसले.याचे व क्रीडा शिक्षिका सौ कुमुदिनी सरदार यांचे पुष्पगुच्छ व पेढा देऊन अभिनंदन केले.
खेळाचे महत्त्व सांगताना सौ.सुनेत्राताई पवार म्हणाल्या की खेळ या शारीरिक व मानसिक कला असून खेळामुळे आपले आरोग्य सुधारून स्नायू बळकट होतात व आपला फिटनेस सुधारतो .शरीराची चपळता वाढून व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे सांगितले.
त्यामुळे सर्वांनी अभ्यासाबरोबर दररोज एक तास तरी कोणता पण एक खेळ खेळण्याचे आवाहन केले सदर कार्यक्रमास जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष सुनंजय पवार. प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड यांचे सह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


