कॉंग्रेसच्या विधानसभा उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू उमदेवार निवडीचा अधिकार खा.प्रणिती शिंदे यांना द्या दत्तात्रय बडवे-शिंदे

0

कॉंग्रेसच्या विधानसभा उमेदवारांच्या मुलाखती उद्यापासून सुरू ** पण अद्याप पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीची मिटींग नाही, भूमिका अस्पष्ट ** उमदेवार निवडीचा अधिकार खा.प्रणिती शिंदे यांना द्या ** 5 वर्ष तोंड न बघणारा उमेदवार लादू नका , कॉंग्रेस कार्यकर्त्यांना विश्वासात घ्या-दत्तात्रय बडवे-शिंदे

    पंढरपूर- लोकसभा निवडणूकीत ज्याप्रमाणे सोलापूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीने खा.प्रणिती शिंदे यांना कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारी द्यावी असा ठराव केला होता त्या धर्तीवर पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीकरिता पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीचे  धोरण अद्याप ठरलेले नाही त्यामुळे तातडीची मिटींग बोलावून उमेदवार निवडीबाबत खासदार प्रणिती शिंदे यांना अधिकार देण्यात यावा असा ठराव करण्यात यावा तसेच पंढरपूर मंगळवेढा ही जागा पुर्वी कॉंग्रेसची होती ती नंतर राष्ट्रवादीकडे गेली अशा भूमिकेमुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील व बाहेरील अनेक नेते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व सुशिलकुमार शिंदे यांचे राजकीय गुरू (कालच अकलूज येथील कार्यक्रमात बोलल्याप्रमाणे) शरद पवार यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी भाजपमधील, शिवसेनेमधील, कॉंग्रेस व राष्ट्रवादीतील, बीआरएसमधील अनेक नेते मंडळी इच्छूक असल्याने त्यांची भेट घेवून तिकीट मागत आहेत.
 परंतू अशा नेत्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांशी 5 वर्षांत संपर्क साधला नाही अथवा त्यांच्या अडचणी कधीही समजून घेतल्या नाहीत व त्याबाबत शासनाकडे, मंदिर समितीकडे पाठपुरावा केला नाही त्यामुळे पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीतील सर्व कार्यकर्ते विधानसभेच्या उमेदवाराबाबत संभ्रमात आहेत निदान आता तरी पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटीने अशा इच्छूक उमेदवारांना  कॉंग्रेस कार्यकर्त्यांची मिटींग बोलवून त्यामध्ये संवाद साधावा. मगच उमेदवारीसाठी शिफारस करावी. लोकसभेची निवडणूक वेगळी होती ती आमचे लोकप्रिय नेते सुशिलकुमार शिंदे साहेब यांची मुलगी असल्याने हा घरातील विषय होता परंतू आता  विधानसभेला मतदारसंघाबाहेरील उमेदवार आहेत तरी त्यांचा इच्छूक उमेदवारांचा व कॉंग्रेस कार्यकर्त्यांची गळा भेट घालून द्यावी व विश्वासात घ्यावे कारण मागील लोकसभेच्या निवडणूकीत बुथवरील पक्षीय एजंटांना नवीन कोऱ्या 15 पानी वॉर्डाच्या याद्या मिळाल्या त्यावेळी ते कोणत्या पक्षाचे आहेत हे सुध्दा पाहिले गेलेले नाही हीच पुनरावृत्ती विधानसभेला होवू नये म्हणून सदरची मागणी करत आहे. जिल्हा कॉंग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीने याची दखल घेवून मिटींग घेण्याबाबत आदेश देण्यात यावा अशी मागणी सोलापूर जिल्हा कॉंग्रेस ब्राह्मण सेलचे माजी अध्यक्ष दत्तात्रय बडवे-शिंदे यांनी केली आहे.
या निवेदनाची प्रत श्रीमंत कृपासागर मा.सुशिलकुमार शिंदे साहेब, मा.खासदार प्रणिती शिंदे सोलापूर, प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी, ऍड.नंदकुमार पवार जिल्हा कार्याध्यक्ष सोलापूर यांना पाठवली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)