पंढरपूरात भव्य "नोकरी महोत्सव" चे थाटात उद्घाटन... सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग
पंढरपूर प्रतिनिधी-- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील तरुण बेरोजगार युवकांना नोकरी मिळवुन देण्यासाठी आज पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठ या ठिकाणी " भव्य नोकरी महोत्सव" चे आयोजन भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या संकल्पनेतून हा भव्य नोकरी महोत्सव या भव्य नोकरी महोत्सवाचे उद्घाटन माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सदर कार्यक्रमात बोलताना अनिल सावंत म्हणाले की मला जेजे उपक्रम जनतेच्या हितासाठी राबविता येतील ते मी भैरवनाथ उद्योग समुहातर्फे राबवित आहे. या पुर्वी अनेक उपक्रम राबविले आहेत. मी विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी हे उपक्रम राबवित नाही. हा उद्देश माझ्या डोळ्यासमोर ठेवला नाही. मी अनेक उपक्रम भैरवनाथ उद्योग समुहातर्फे राबविले आहेत. व राबवित आहे. उमेदवारीसाठी मी नक्कीच आग्रही व इच्छुक आहे. त्या दृष्टीने मी पवार साहेबांना भेटून उमेदवारीची इच्छाही व्यक्त केली आहे. पवार साहेबांना जे सांगायचे ते मी सांगितले आहे. त्यादृष्टीने मी उमेदवारीची वाट पहात आहे. पांडुरंगाच्या आशीर्वादाने व मतदारांनी मला ही संधी दिली तर त्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नाही. मी चांगलेच काम करीन व मतदारांना कधीही असे वाटणार नाही की आपण चुकीच्या माणसांला मत देऊन निवडून आणले आहे.यांची खंत कधीच मतदारांना वाटणार नाही इतके चांगले काम मी करणार आहे. समजा मला उमेदवारीची संधी नाही मिळाली तरी मी व भैरवनाथ उद्योग समुह कायम तुमच्या सेवेत राहणार आहे. मी कोणत्याही कामात कमी पडणार नाही यांची खात्री देतो.
या नोकरी महोत्सव मध्ये महाराष्ट्रातील ५० कंपन्या सहभागी झाले आहेत.तर ऑनलाईन अर्ज १००० आले आहेत तर या कंपन्या मधून सुशिक्षित तरुण बेरोजगारांना ४५०० कर्मचारी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.त्यामुळे प्रत्येकांस नोकरी मिळणार आहे.या नौकरी महोत्सवात मोठ्या प्रमाणावर तरूण तरूणींचा सहभाग होता. पंढरपूर मंगळवेढा मतदार संघातील तरुणांना विविध कंपन्यांच्या माध्यमातून नोकरी मिळावी म्हणून हा नोकरी महोत्सव आयोजित करून अनिल दादा सावंत यांनी तरुण बेरोजगारांची मानसिकता जाणून या बेरोजगार युवकांना नोकरी मिळावी म्हणून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला आहे.
या ठिकाणी विविध शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवाराला या ठिकाणी आलेल्या विविध कंपन्यांच्या कडून मुलाखत घेतली जाणार आहे.आणि कंपनीला जे कोणी उमेदवार योग्य असतील त्यांना नोकरीचे नेमणूकीचे पत्र दिले जाणार आहे.
नौकरी महोत्सवात तब्बल 540 युवकांना नियुक्तीपत्र....
आज भैरवनाथ शुगर व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आयोजित भव्य नोकरी महोत्सवास पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी प्रचंड सहभाग नोंदवला यामध्ये 1439 युवकांनी नोकरीसाठी अर्ज केले त्यापैकी तब्बल 540 युवकांना नियुक्तीपत्र देण्यात आले. विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तसेच लोकल कंपन्यांमध्ये 540 लोकांची नियुक्ती झाल्यामुळे नियुक्ती पत्र मिळालेल्या युवकांनी सावंत यांनी आयोजित सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवर अनिल दादा सावंत, संदीप मांडवे,यावेळी नागेश भोसले, आदित्य फत्तेपुरकर,शाम गोगाव,एम पाटील,अमर सूर्यवंशी, संजय बंदपट्टे, आदी मान्यवर उपस्थित होते.




