दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद यांचा सत्कार

0

सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ द्यास समजून समाजातील दुःखी पिढी वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी  त्याचबरोबर अत्याचार ग्रस्त अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न प्रशासन दरबारात मांडून  त्यांच्या हितासाठी विकासासाठी नेहमीच दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्रातून लेखणीच्या माध्यमातून  प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न युवा संपादक अक्षय बबलाद यांनी केला आहे दैनिक लोकशाही मतदार वृत्तपत्रा च्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्हा सह  महाराष्ट्र राज्यातील सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व राजकीय बातम्यांचा आढावा घेऊन दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राने  एक आगळावेगळा ठसा निर्माण केला असून  अल्पावधीत  दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचा  वाचक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे  दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन जनक्रांती पत्रकार संघ व बशीरूज्जमाँ या संस्थेकडून दैनिक लोकशाही मतदार चे युवा संपादक अक्षय बबलाद यांना विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श पत्रकार म्हणून अक्षय बबलाद यांचा  सन्मानपत्र सन्मानचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला होता.

 दैनिक लोकशाही मतदार या वृत्तपत्राचे युवा संपादक अक्षय बाबलाद यांना आदर्श पत्रकार म्हणून पुरस्कार मिळाल्याने  पत्रकार सुरक्षा समिती वतीने  मोहोळ तालुका अध्यक्ष बंडू तोडकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील कार्यकिर्दीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा संघटक आन्सर तांबोळी (बी एस ) जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड पत्रकार सुरक्षा समितीचे  संभाजी गोसावी मोहम्मद इंडिकर  संतोष मोरे कलीम शेख इम्रान अत्तार लक्ष्मण गणपा इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)