महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप

0

 

पंढरपूर  प्रतिनिधी -  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून सक्रिय जीवित नोंद असणा-या कामगारांना गृहोपयोगी साहित्य संचाचे वाटप सत्यशोधक कामगार संघटनेच्या माध्यमातून पंढरपुरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे करण्यात आले. यावेळेस संचाचे वाटप प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी परिचारकांनी संबोधित करताना कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. 

गृहोपयोगी संच्यामध्ये ताट - ४, वाट्या - ८, पाण्याचे ग्लास - ४, पातेले झाकणासह - ३, मोठा चमचा -३, पाण्याचा जग , मसाला डब्बा, डब्बे -३, परात , प्रेशर कुकर पाच लिटर, कढई,  स्टील टाकी मोठी, एकूण ३० नगांचा समावेश होतो. या वेळी कामगारांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कामगार कल्याण मंडळ स्वातंत्र्यापासून अस्तित्वात आहे, परंतू ख-या अर्थाने विविध योजनांचा लाभ साध्य मिळत आहे. शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ कामगारांना मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत परिचारक  सांगितले....!


कामगारांचा घरकुल प्रश्न प्राधान्याने सोडवून, पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेची घरे कामगारांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणार. कामगारांना शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, सामाजिक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार. सामाजिक कार्य करताना उपेक्षित, वंचितांसाठी काम करणे महत्वाचे असल्याचे सांगितले. यावेळेस रवी सर्वगोड, प्रदीप परकाळे, शाहू सर्वगोड,  किशोर कदम, समाधान भोसले, सतीश सर्वगोड, सिध्दनाथ सांवत, राजेंद्र सर्वगोड, लक्ष्मण बंगाळे, तुकाराम मोळावडे, शरद सोनवणे, अमोल पाटील,गणेश सर्वगोड, स्वप्नील कांबळे, सुरज साखरे इत्यादी उपस्थित होते.

     
   

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)