बाजार समितीमध्ये बेदाणा शेतीमालाची रू.३७० कोटी, डाळींब रू.८० कोटी, फळे व भाजीपाला रू.३६ कोटी, भुसार धान्ये रू.२१ कोटी, कांदा रू.१२ कोटी, जनावरे रू.५ कोटी, केळी रू.३ कोटी, वैरण रू.१ कोटी अशी एकुण बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५२८ कोटी झालेली आहे. या उलाढाली मधुन रू.४.४० कोटी उत्पन्न बाजार समितीस मिळालेले आहे. बाजार समितीने शॉपिंग सेंटर गाळे, आडत व्यापारी गाळे, सौदे कामकाज करिता सेलहॉल, स्वच्छतागृहाची सोय, पिण्यांचे पाण्यासाठी आर.ओ. प्लॅन्ट, बाजार आवार वॉल कंपाउंड, ६० मे.टनी वजनकाटा इत्यादी विविध विकास कामे केलेली असुन बाजार आवारात सि.सी.टी. व्ही यंत्रणा बसविणे, फळे व भाजीपाला मार्केट साठीचे गाळे, डाळींब मार्केट करिता काँक्रीटीकरण करणे, कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक मालक यांचा पुतळा उभारणी करणे, सौर उर्जा प्रकल्प, रस्ते, शॉपिंग सेंटरचे वरील मजल्याचे बांधकाम, शेतकरी भवन, पेट्रोल पंप. इत्यादी कामे व इतर सोयी सुविधा करण्यांचा आमचा मानस आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळा कडील शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहोत. बाजार समितीचे आवारामध्ये फळे, भाजीपाला, कांदा, डाळींब, केळी, भुसार धान्ये, बेदाणा इत्यादी सौदे कामकाज चांगल्या प्रकारे चालु आहे. बाजार समितीच्या बँकेतील गुंतवणुकी मध्ये वाढ झालेली आहे. तसेच आवश्यक विकासकामे पूर्ण करून व्यापार वाढीसाठी प्रयत्न करीत आहोत. असे सांगितले.
मान्यवरांचे सुरूवातीस बाजार समितीचे उपसभापती मा. श्री. राजुबापू विठ्ठलराव गावडे साहेब यांनी सर्वांचे स्वागत केले.
बाजार समितीने सुरू केलेल्या उपक्रमातून बाजार आवारात जास्तीत जास्त शेतीमाल विकी केल्याबद्दल शेतकरी श्री विक्रम प्रल्हाद डोंगरे रा.आढेगांव ता. मोहोळ, श्री. अभिमन्यु कोंडीबा जाधव, रा. जाधववाडी ता. पंढरपूर, श्री. रेवणनाथ भुजंगराव पाटील रा. घोटी ता. करमाळा, श्री.हणमंत भगवान झगडे रा. जळोली ता. पंढरपूर, श्री. जालींदर महादेव बनकर, रा. पिसेवाडी ता. माळशिरस, श्री. सुरज दोशी रा. गादेगांव ता. पंढरपूर, श्री. मारूती दाजी रूपनर, रा.महिम ता. सांगोला, श्री. आकाश संभाजी थिटे रा. भोसे ता. पंढरपूर यांचा व जास्तीत जास्त बेदाणा शेतीमाल विक्री केल्याबद्दल बेदाणा असोसिएशन, पंढरपूर चे अध्यक्ष मा.श्री. सोमनाथ डोंबे, तसेच आडते तुलसी ट्रेडींग कंपनी प्रो. विनीत अशोक बाफना, आशिष ट्रेडींग कंपनी प्रो. संजय प्रल्हाद मस्के, श्री. धनंजय कोंडीबा गाडेकर, सोहम ट्रेडींग कंपनी प्रो. अशोक बळीराम शिंदे, बालाजी फुट सेल प्रो. सचिन बबन गंगथडे, श्री विठ्ठल ट्रेडींग कंपनी प्रो. राहुल सुभाष देवकर, राजकुमार दिपचंद फडे प्रो. अनिलकुमार दिपचंद फडे यांचाही सन्मान करण्यांत आला.यावेळी बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष व संचालक मा.श्री. सोमनाथ डोंबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.श्रध्दांजलीचा ठराव बाजार समितीचे संचालक मा.श्री. शिवदास ताड यांनी मांडला.
विषय वाचन व अहवाल वाचन सचिव श्री. कुमार घोडके यांनी केले. बाजार समितीचे सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात एकूण उत्पन्न रू.४,४०,६१,४४१/- झाले असून एकूण खर्च रू.३,०३,४३,७४५/- इतका वजा जाता सरप्लस/वाढावा रू. १,३७,१७,६९६/- इतका झालेला आहे. बाजार समितीची वार्षिक उलाढाल ५२८ कोटी रूपये झालेली आहे.शेवटी संचालक मा.श्री. तानाजी पवार यांनी सर्वांचे आभार मानले. सदर कार्यकमाचे सुत्रसंचालन लेखापाल श्री. गजेंद्र जोशी यांनी केले.
या सभेस कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. साखर कारखान्याचे माजी चेअरमन मा.श्री. दिनकरभाऊ मोरे, अर्बन बँकेचे चेअरमन मा.श्री. सतिशराव मुळे, मा.श्री. प्रणव परिचारक मालक, मा.श्री.बाळासाहेब देशमुख, व्हा. चेअरमन मा.श्री. कैलास खुळे (सर), पंचायत समितीचे माजी सभापती मा.श्री. वामनराव माने (सर), बाजार समितीचे माजी सभापती मा.श्री. भगवानराव चौगुले, मा.श्री. दाजी भुसनर-पाटील, माजी उपसभापती मा.श्री. लक्ष्मणराव धनवडे, मा.श्री. संतोष घोडके, मा.श्री. विवेक कचरे, मा.श्री. बाळासाहेब माळी, मा. श्री. पंडितराव भोसले, मा. श्री. प्रशांतभैय्या देशमुख, मा.श्री. दिलीप गुरव, मा.श्री. अरूण घोलप, मा श्री. तानाजीराव वाघमोडे, मा.श्री. विजय जाधव, मा.श्री. सुदाम मोरे, मा.श्री. रघुनाथ गोडसे, मा.श्री. दत्तात्रय ताड, मा. श्री. सितारामभाउ नागणे, मा.श्री. आण्णासाहेब बंगाळे, मा.श्री. बाबासाहेब पाटील, मा.श्री. हरीभाउ गावंधरे, मा.श्री. तमीम इनामदार, मा.श्री. बाळासाहेब शेख, मा.श्री.बाळासाहेब यलमर, व्यापारी श्री. अशोकशेठ बाफना, श्री. मुकुंददास मर्दा, श्री. सुरेश कुलकर्णी मा.श्री. इकबालभाई बागवान, मा.श्री. सिकंदर बागवान, श्री. राजाभाऊ नवाळे, श्री. सुभाष मस्के सर, मा.श्री. वसीम बागवान, मा.श्री. जोतीराम सासवडकर, मा.श्री. संजय नागणे, मा.श्री. पिंटु बागल, मा.श्री. आखलाख बागवान, मा.श्री. सोमनाथ आंबरे, मा.श्री. महंमद लिगाडे, मा.श्री.धनराज शेंबडे, मा.श्री. आसिफ बागवान, मा.श्री. अमोल महिमकर, मा.श्री. प्रदिपकुमार फडे, मा.श्री. महावीर फडे, मा.श्री. खलील बागवान, मा. श्री. जुबेर बागवान, मा.श्री. आनंद शेटे, मा.श्री.जीवन कराडे, मा.श्री. विवेक कोरे तसेच बाजार समितीचे संचालक मा.श्री. दिलीपराव चव्हाण, मा.श्री. हरिभाऊ फुगारे, मा.श्री. संतोष भिंगारे, मा.श्री. तानाजी पवार, मा.श्री. महादेव बागल, मा.सौ. शारदा अरूण नागटिळक, मा. सौ. संजिवनी बंडू पवार, मा.श्री. महादेव लवटे, मा.श्री. नागनाथ मोहिते, मा.श्री. अभिजीत कवडे, मा.श्री. पंडित शेंबडे, मा.श्री. वसंत चंदनशिवे, मा.श्री.शिवदास ताड, मा.श्री. यासीन बागवान, मा.श्री. आबाजी औदुंबर शिंदे तसेच तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे चेअरमन व प्रतिनिधी, हमाल पंचायत प्रतिनिधी, ग्रामपंचायत सरपंच व प्रतिनिधी, आडते, व्यापारी प्रतिनिधी, बाजार समितीचे सहा. सचिव श्री. संजय माने व कर्मचारी आदी उपस्थित होते.



