पंढरपूर ( प्रतिनिधी) दिनांक 19, 20 ऑक्टोबर दीपावली सणाच्या निमित्ताने पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व जनतेने दीपावली निमित्तने खरेदीसाठी पंढरपूर येथील टिळकस्मारक मंदिर च्या मैदानामध्ये वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोनशे स्टॉल या ठिकाणी महिला या आपापले बनवलेले खाद्यपदार्थ साहित्य त्याचप्रमाणे आकाश कंदील पणती,दिवे आधी विक्रीसाठीचे स्टॉल हे या ठिकाणी भरणार आहेत.
या ठिकाणी आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व मनसेच्या वतीने विविध स्टॉलच्या माध्यमातून महिलांना आपले बनवलेले खाद्यपदार्थ विक्रीसाठी या ठिकाणी एकाच छताखाली दीपावली निमित्ताने सर्वसामान्य ग्राहकांना या ठिकाणी विविध पदार्थ व वस्तू खरेदी करता येणार असून आद्य वीरशैव महिला मंडळ व महाराष्ट्र नवनिर्माण सेने च्या माध्यमातून मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर मध्ये भव्य असा एक्सपो एका छताखाली दिवाळीची खरेदी व्हावी या उद्देशाने हा एक्सपो भरवला जात आहे. या ठिकाणी महिला आपापला स्टॉल मधून विविध दीपावलीनिमित्त पित्ताने विविध खाद्यपदार्थ व आणि साहित्य विक्री ठेवता येणार आहे.
या स्टॉलच्या उभारणीसाठी भाडे आकारले जाणार नाही. त्याचप्रमाणे गरजू महिलांना पंचवीस हजार रुपये लोन देणार असून याची परतफेड हा एक्सपो संपल्यानंतर करण्याची अट असणार आहे. अशी माहिती मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.
सर्वसामान्य महिलेला आर्थिक बाबतीत सबला करण्याच्या उद्देशाने आद्य वीरशैव महिला मंडळ पंढरपूर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी याचा लाभ महिला आणि घ्यावा. असे आवाहन मनसेचे नेते दिली बापू धोत्रे यांनी आज रोजी केले.101 रुपये नोंदणीची फी आकारली जाणार असून स्टॉल धारकांना स्टॉल भाडे आकारले जाणार नाही. अशी माहिती दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.


