पंढरपूर - दिलीप बापु यांनी अनेक वर्ष मनसे म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये राहून अनेक संघर्ष करून, व एकनिष्ठ राहून आपले अस्तित्व दाखविले या संघटनेसाठी अपार कष्ट, मेहनत, करून त्यांनी पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्रात आपले नेतृत्व जपले व सत्कारणी लावले. राजसाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ, प्रामाणिक मनसे नेते म्हणून दिलीप बापुं यांची ओळख आहे. मनसेच्या व राजसाहेबांचा कुठलाही कार्यक्रम कुठेही असो त्या कार्यक्रमाचे नियोजन दिलीपबापु हेच करतात व नियोजनाबद्दल त्यांचेच नाव घेतले जाते यात कुठलीही शंका नाही. आता येणार्या विधानसभेसाठी अनेक मनसे नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. पण राजसाहेबांचे एकनिष्ठ मनसे नेते म्हणजे दिलीप बापु यांनाच मान मिळाला व त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचे चिज झाले. पहिल्या पाच जणांच्या यादीमध्ये दिलीप बापुचे नांव एक नंबरवर होते व त्यांची पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे उमेदवार म्हणून उमेदवारीही जाहीर झाली. उमेदवारी नसतांनाही त्यांनी समाजासाठी इतकी कामे केली आहेत ते येथे लिहीणेही कठीण आहे इतकी मोठी त्यांच्या कामाची यादी आहे. पुर्वीही मनसेचे काम जोमात होते व मनसेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही मनसे कार्यकर्ते व बापुनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह पंढरपूर मंगळवेढा विधान सभा संघाचा उमेदवार म्हणून आपले कार्य जोमात चालू ठेवले.
विधानसभा प्रचाराचा शुभारंभ म्हणून त्यांनी नुकतेच अमित राजसाहेब यांच्या हस्ते भव्य कुस्त्यांचे “ मनसे कुस्ती “ आयोजन केले व तेही मंगळवेढ्यात ठेवले खरे तर मंगळवेढा व शेजारील आजुबाजुच्या ग्रामीण भागात अनेक मल्ल आपले अस्तित्व जपून आहेत. त्या सर्वांना बरोबर घेऊन त्याच्या बैठका घेऊन मंगळवेढ्यातच कुस्त्याचे मैदान भरवायचे ठरविले. व त्यासाठी त्यांनी सर्व ठिकाणाच्या नामांकित मल्लांना एकत्र केले अनेक भरघोस बक्षिसे जाहीर केली. शंभर रूपये पासून पाच लाखापर्यत बक्षिसे घोषित केली व बघता बघता कुस्तांचे नियोजन ही झाले. दिलीप बापुनी अनेक वस्तादांना जवळ केले त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व त्यांना कुठलीही अडचण असो त्यावर तोडगा काढला. व राजसाहेबांच्या मदतीने तुम्हा सर्व कुस्तीगीरांच्या ज्या अडचणी आहेत त्या मी स्वत: सोडवितो असे वचन दिले व दिलीप बापुनी बोलल्याप्रमाणे अमित साहेबांना बोलावून त्यांना सर्व समस्या सांगितल्या व त्या तडीस नेण्यास अमितसाहेबांनी होकार दिला.
मंगळवेढ्यात कुस्त्याचे मैदान भरणार म्हणून अगदी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघच नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात व इतर ठिकाणाच्या मल्ल यांनाही ही माहिती मिळाली व या स्पर्धेत भाग घेण्यासाठी अनेक कुस्तीगीर यांनी विचारपुस चालू करून मंगळवेढा या ठिकाणी आपली हजेरी लावली.
दिलीप बापु खरे तर खुप नशिबवान आहेत. रविवारी कुस्त्या होणार व त्या 5 नंतर होणार म्हणून अनेक रसिक गोळा झाले होते दुपारपासूनच मंगळवेढा इतर ठिकाणी यांची चर्चा ही चालू होती पण मंगळवेढ्यात ढगाची गर्दी चालू झाली आणि दुपारी तीनच्या दरम्यान ढगांनी आकाशात गर्दी केली.आणि सणकून पावसांची सुरूवात झाली. बापुपेक्षाही अनेक कुस्तीगीर,मल्ल,वस्ताद, यांच्या चेहर्यावर निराशेची भावना दिसून आली मीपण कुस्त्यांचे मैदान बघुन आलो अनेक ठिकाणी पाणी साठले होते, खुर्च्या रिकाम्या होत्या, स्टेजवरही गर्दी कमी होती पाऊस थांबतो की नाही यांची विवंचना तेथे जमलेल्या प्रत्येकालाच व मलापण होती. दिलीप बापुंनी अपार मेहनत व खर्च करूनही नैसर्गिक आपत्ती ओढावती की काय अशी अनेकांना शंका येऊ लागली, पण बापुंनी केलेल्या कष्टाचे फळ म्हणूनच काय एक तासाभरांने पुन्हा निसर्गाने साथ दिली व थोडेसे ऊन पडल्यासारखे झाले, आभाळ फटफटीत झाले. आणि जमलेल्या अनेकांच्या तोंडावर उत्साह जाणवू लागला. स्टेजवर गडबड चालु झाली संयोजक कुस्ती लावण्याच्या तयारीत आले व अनेक छोट्या कुस्तांना सुरूवात झाली. व गर्दी जमु लागली अनेक कुस्ती शौकीन गर्दी करू लागले,त्यातही अनेक बुजर्ग मंडळी होती पण त्यांचा उत्साह खुप मोठा होता. कुस्त्या चालू झाल्या आणि पुन्हा निसर्गाने आपले रूप दाखविले साधारण सहाच्या दरम्यान पुन्हा आकाशात ढगाची गर्दी झाली अनेक ठिकाणाहून आलेले मनसे कार्यकर्ते चिंतेत पडले. पण थोड्याच वेळाच ढगाची गर्दी कमी झाली व पुन्हा सर्वाच्या चेहर्यावर हसु उमटले. दिलीप बापुंनी कुस्तीगीर यांच्यासाठी कार्याचे फळच त्यांना मिळाले.
जुनी एक म्हण आहे “ देव तारी त्याला कोण मारी “ त्याप्रमाणेच दिलीप बापुंनी केलेल्या कार्यात कुठलाही अडथळा आला नाही. हीच “ प्रामाणिक पणे केलेल्या कामाची पावतीच होती ” थोड्याच वेळात दिलीप बापु व अमित साहेबांचे आगमन झाले. दहा जेसीबीच्या साहय्याने अमित साहेब,मनसे भावी आमदार दिलीप बापु यांच्यावर पुष्पवृष्टी झाली व सर्वच मनसे कार्यकर्ते,वस्ताद, पैलवान यांचा उत्साह वाढला.
छोट्या कुस्त्या चालूच होत्या व अमित साहेब त्या उत्सकतेने बघत होते, तसे तर अमित साहेब मोठ्या शहरात असल्यामुळे जीम वगैरे त्यांना माहित होते व तेही व्यायामासाठी दक्ष आहेत. जीम मध्ये आपली मेहनत करून आपले शरीर सदृढ ठेवले आहे. अमित साहेबांनी कुस्ती मैदान फिरून पाहिले. अनेक मल्लांना त्यांनी हास्तोलदन केले व स्टेजवर न जाता आपल्या महाराष्ट्रांच्या मातीशी जपत त्यांनी लाल मातीत थांबूनच आपले मनोगत कुस्तीच्या रणांगणात सांगितले. खरे तर त्यांनी आपल्या भाषणांचा ओघ राजकीय न करता कुस्तीगीरांना प्रोत्साहन देऊन केला. व त्यालाही कुस्तीगीर मैदानातील सर्वांनीच याची दखल घेतली. व त्याचवेळेस त्यांनी दिलीपबापुंनी केलेले हे नियोजन खुपच कौतुकास्पद असल्याचे सांगितले. या ठिकाणी आलेल्या कुस्तीगीर,वस्ताद यांनी कुठलीही अडचण आल्यास त्यास अमित ठाकरे यांनी भरभरून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तर दिलीप बापुंना आपण साथ देऊन सर्वसामान्यांचा नेता बनवून गोरगरिब,दलित,बेरोजगार, यांची सेवा करण्यासाठी आपण एक संधी द्यावी या संधीचे सोने दिलीप बापू करतील यात कुठलीही शंका नाही असे गौरउद्गार काढले. व दिलीप बापुच्या केलेल्या कामांचे कौतुक करून त्यांनी व सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.



