यासाठी पत्रकार संघटनेचे अनेक पदाधिकारी व सदस्य संटनेसाठी कार्यरत असतात पण त्यांच्या कामाचा योग्य तो सन्मान व्हावा या उद्देशाने विशेष काम करणार्या सदस्याचा योग्य सन्मान करावा ही पत्रकार सुरक्षा समितीचे सर्वे सर्वा यशवंत पवार यांची भावना आहे याच विचारांने अनेकांचा सन्मान स्मृतीचिन्ह व शाल श्रीफळ देऊन करण्यात आला.
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पंढरपूरातील पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी अग्रेसर असणारे व सर्वाना सामावून घेणारे पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री दत्ताजीराव पाटील यांची जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले.
सदर प्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीचे यशवंत पवार, रामभाऊ सरवदे, अक्षय बबलाद, सादिक शेख, अमर पवार, सुशिल वाघमारे,शंकर माने, अरूण सिडगिद्दी,तर आदर्श शिक्षक युसुफ तांबोळी,कृषीभुषण बाबुराव शिंदे, यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभानंतर अल्पोहाराने या कार्यक्रमाची सांगता झाली.




