श्री विठ्ठल रुक्मिणीमातेस भाविकाकडून 1 लक्ष रुपयाची देणगी;

0

पंढरपूर :- पंढरपूर येथील भाविक आशा वामन कुलकर्णी यांनी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीस 1 लक्ष रुपयाची देणगी धनादेश स्वरूपात दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

      यावेळी मंदिर समितीच्या वतीने आशा कुलकर्णी यांचा सत्कार मंदिर समितीचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन सन्मान करण्यात आला. या देणगीदाराने आपल्या आई-वडिलांच्या म्हणजेच कै. श्री व सौ सरस्वती विनायक पिंपरकर यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आहे. यावेळी देणगीदार कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. 

    देणगी देणाऱ्या इच्छुक भाविकांनी मंदिर समिती कार्यालयात संपर्क करावा. देणगीसाठी क्यू आर कोड, धनादेश, रोख स्वरूपात, आरटीजीएस, मोबाईल ॲप, संकेतस्थळ इत्यादी माध्यमातून सोय उपलब्ध आहे. याशिवाय, अन्नछत्र सहभाग योजना व महानैवेद्य सहभाग योजना देखील उपलब्ध असल्याचे विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)