आमदारांनी ‘ त्या’ आश्वासनाची पुर्तता करावी-- ग्रामस्थांची मागणी
पंढरपूर : पंढरपूर बोहाळी रस्ता ते देठे मळा या उजनी कॅनालवरील कच्चा रस्ता त्वरीत दुरूस्त करून देऊ व या भागातील ग्रामस्थांची अडचण दुर करू असे आश्वासन मा.आमदार प्रशांत परिचारक व विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी दिले होते. त्याला आता अडीच वर्षे पुर्ण होत आली तरीही या रस्त्याचे काम झाले नाही. त्यामुळे या आमदार द्वयांनी तातडीने काम पुर्ण करावे अशी मागणी होत आहे.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार कै.भारतनाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत समाधान आवताडे हे विजयी झाले त्यांचा सत्कार पंढरपूर तालुक्यातील मौजे कोर्टी येथील देठे मळा येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी रस्त्याची अडचण त्याच्या समोर मांडली होती त्यावेळी उपस्थित आमदारांनी हे काम तातडीने करू असे आश्वासन दिले होते परंतु आज या गोष्टीला अडीच वर्षाचा काळ पुर्ण होत आला तरी ते पुर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे ग्रामस्थामधून संताप व्यक्त केला जात आहे.
या अडीच वर्षाच्या काळामध्ये अनेकांनी अनेक वेळा भेटून याबाबत आठवण करून दिली तरीही केवळ आश्वासना पलीकडे त्यांच्या पदरी काहीही पडलेले नाही. या रस्त्यावरून प्रतिदिनी शेकडो लोकांची ये-जा असते शाळेत जाणारी लहान मुले, हायस्कुल जाणारी मुले, तसेच कामानिमित्त ये-जा करणारे लोक यांची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहेत. पावसाळ्याच्या दिवसात साधे चालणेही शक्य होत नाही,जागोजागी वहाने अडकून पडतात, जनावरासाठी वैरण घेऊन आलेली वाहने रस्त्यातच अडकून पडत असल्याने ती वाहने बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागत आहे. अशा प्रकारची परिस्थिती येथे असल्याने वैरण टाकायला येणारी वाहने सुध्दा येण्यास तयार होत नाहीत. येथील ग्रामस्थांना अकारण जादा पैसे देऊन व वाहन चालकाची मनधरणी करून कसाबसा जनावरांचा चारा वस्तीपर्यंत आणावा लागत आहे. रोजच्याच या अडचणीमुळे ग्रामस्थामध्ये वारंवार संताप व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या रस्त्यावर खडी व मुरूम टाकून चिखल होणार नाही असा तात्पुरता का होईना रस्ता त्वरीत तयार करून द्यावा व पावसाळ्यानंतर दिलेल्या आश्वासना प्रमाणे पक्का रस्ता तयार करून द्यावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आह



