रुक्मिणी विद्यापीठाच्या वतीने पंढरीत खास महिलांसाठी मंगळागौर स्पर्धेचे आयोजन.....

0

पंढरपूर: टपोरा एक थेंब पानावरून घसरला, कळीच्या गालावर क्षणभर विसावला, आणि अलगद कुजबुजला सखे श्रावण आला ,श्रावण आला अशा या हिरवाईच्या ऋतूमध्ये आपण भेटूयात साऱ्याजणी मंगळागौरीच्या खेळाचा आनंद घ्यायला .

श्री. रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापक सचिवा सौ.सुनेत्राताई पवार यांचे कुशल मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक २८/०८/२०२४रोजी सकाळी ११=००वाजता श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी पंढरपूर येथे खास सखी साठी तिचं माझं व्यासपीठ.... कार्यक्रमांतर्गत श्रावण सरी "मंगळागौर "स्पर्धेचे आयोजन केले असल्याचे सांगितले आहे..

 या अंतर्गत स्मार्ट सासूबाई , नथ विषयी चारोळी महाराष्ट्रीयन वेशभूषा, डोळे बांधून दहीहंडी फोडणे इत्यादी स्पर्धासह खवय्यांसाठी स्टॉलचेही आयोजन केले आहे.

 मंगळागौर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु.१०,०००/- व ट्रॉफी द्वितीय पारितोषिक रु.७०००/- व ट्रॉफी देऊन तर इतर स्पर्धांसाठी आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.

 यामधील सहभागासाठी जास्तीत जास्त महिला व महिला मंडळांनी भाग घेण्यासाठी विभावरी डुबल , ९१७५६०५१३३, सविता लोखंडे८३९०३१६७२७ , राणी गावडे ८३७९८९०३५७ ,वैशाली कदम ७०२८१०७७६९ यांचेकडे संपर्क साधण्याचे कार्यक्रमाच्या संयोजिका सौ. सुप्रिया पवार यांनी यासाठी आवाहन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)