सर्वसामान्यांचा नेता अभिजीत पाटील

0

 

ग्रामीण भागातून अनेक टक्के टोणपे खात कुठलीच पार्श्वभुमी नसतांना, सोबत ना कोणता नेता, नाही ना पक्ष नाही...... वडिलांची गडगंज संपत्ती नाही की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही सुरूवातीच्या काळात मला या समाजासाठी काहीतरी करावयाचे ही जिद्द मनात ठेवून समाजकारणाचा वसा घेतलॉरिहग, अनेकांनी या माणसास चांगले सल्ले दिले की बाबा है तुझे क्षेत्र नाही यात अनेक मातब्बर आहेत त्यांचीच येथे चलती चालत नाही त्यामुळे हे समाज कारण करण्यापेक्षा वेगळे विश्व निर्माण कर व त्यात यश मिळाव पण आबाला समाजकारणाचा नादच लागला होता, कुणी काही म्हणो आपल्याला समाजकारण करून दिनदुबळ्या शेतकरी, कष्टकरी लोकांना साथ देऊन त्यांच्या संसाराला हातभार लावून त्यांना समाजात उच्च स्थान मिळवून द्यावयाचे व त्यांची मुले मोठी होऊन उच्चशिक्षित व्हावीत हाच ध्यास घेतला पण यासाठी नुसते बोलून किंवा पैसा खर्च करून चालणार नव्हते तर त्यासाठी राजकारणात येऊनच हे काम करावे लागणार होते हे निश्चित केले. आबाला राजकाणाचा गंध नसताना सुध्दा राजकारण आणि कारखानदारी पैकी कोणतीही पार्श्वभूमी नसताना या तरूणांनी साखर कारखाने खरेदी करून ते पूर्ण क्षमतेने चालवले आणि ते करताना कामगाराबरोबरच शेतकऱ्यांचे हित जोपासले

पंढरपूराचा राजवाडा म्हणजे विठ्ठल सहकारी साखर कारखाना या कारखान्याचा सुवर्ण काळ अनेकांनी पाहिला, पण ज्यावेळेस तो बंद पडला त्यावेळेस अनेक ज्येष्ठ शेतकऱ्यांना आपले अश्रु अनावर झालेले अनेकांनी पाहिले, शेतकरी दुखावला गेला अनेकांनी हा कारखाना आता चालू होऊ शकत नाही असे गृहीतच परले होते. विठ्ठल कारखाना म्हणजे संपुर्ण पंढरपूर तालुक्याचा आर्थिक कणा होता तो काही काळ थंडावला होता पण आबांना हे पाहवले त्यांनी एक ध्य तच घेतला की काही करून विठ्ठल कारखाना चालू करावयाचा पंढरपूरातील शेतकरी व कामगार, व त्यावर पंढरपूरात चालणाऱ्या व्यवसायाला व पंढरपूर तालुक्याच्या विकासाला हातभार लावायचा हे करतच त्यांनी विठ्ठलची निवडणूक लढविली व अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आबांना साथ दिली व विठ्ठल शहकारी कारखान्याची निवडणूक जिंकली, हे कोणा सर्वसाधारण माणसाचे काम नव्हते. ऊसतोडणी कामगारांचा अभाव आणि आंतरराष्ट्रीय साखरेच्या पडलेल्या किमती. या सर्व गोष्टींमुळे भल्या भल्या कारखान्याला उसाचे पहिले बिल सुद्धा देता आले नाही. उलट आबासाहेबांनी या सर्व गोष्टींवर मात करत, शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासून निवडणुकीत दिलेला शब्द पाळत शेतकरी, तोडणी कामगार, व्यावसायिक यांची थकित बिले ताबडतोब दिली, तर विठ्ठलच्या सुरूवातीच्या काळात जसे विठ्ठलचे बिल कसे मिळणार कोणत्या दिवशी मिळणार हे शेतकऱ्यांना व सभासदांना कळावे म्हणून पंढरपूर भागात टांग्यातून लाऊडस्पिकर लावून गल्लोगल्ली फिरवला हे पाहून अनेक वयोवृध्द शेतकरी सभासदांना विठ्ठलचा सुवर्ण काळाची आठवण झाली व हा सुवर्ण काळ एका तरूणाने म्हणजेच आबासाहेबांनी सर्वसामान्यांना दाखवून दिला आज विठ्ठलची यशस्वी घोडदौड चालू आहे.

जगामध्ये कोरोनाचे संकट आले त्यावेळेस अगदी रस्त्यावर येण्यास सुध्दा नागरिक घाबरत असत अशी भयानक परिस्थिती होती, अनेक मोठ्या हॉस्पीटलला ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला. नागरिकाच्या जिवाशी खेळ चालू झाला, अनेक गोर गरिब शेतकरी यांना काय करावे सुचेना सगळेच व्यवहार बंद असल्यामुळे आर्थिक संकट समोर उभे राहिले होते. जी काही आर्थिक जमा रक्कम होती तीही खर्च होऊ लागली ऑक्सिजन मुळे अनेकांना यांचा फटका बसला, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये यांची उपलब्धता होत होती पण तिथला खर्च सर्वसामान्याना परवडणारा नव्हता त्याच काळात साखर कारखानदारांनी ऑक्सिजनची निर्मिती करावी असे आवाहन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आणि सगळ्यात पहिला प्रतिसाद दिला तो अभिजीत पाटील यांनी. ह्याच वर्षी सुरू केलेल्या डीसलरीच्या माध्यमातून मिळणारा लाखों रुपयांचा रोजचा व्यवसाय बंद करून त्यांनी ऑक्सिजनची निर्मिती सुरू केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्सिजन मॅन म्हणून ओळख मिळवली. आज हजारो कुटुंबांची उपजिविका विठ्ठल कारखान्यावर अवलंबून असून एक रुपयाही कुणाचे देणे थकीत नाही. ही झाली कारखानदारीची बाजू तर दुसरीकडे कोरोना काळात सर्वाधिक मदत करणारा, स्वतःचे मल्टिप्लेक्स सिनेमागृह बंद करून कोरोना हॉस्पिटल सुरू करणारा आणि हजारो तरूणांना दिशा दाखवणारा हेच अभिजीत पाटील आज तरुणांस ठी आदर्श ठरत आहेत. सामाजिक कार्यात सोलापूर जिल्ह्यात ते आघाडीवर आहेत. प्रत्येकाला हक्काने मदत करणारा माणूस अशीच त्यांची लोकांम ये खरी ओळख आहे. कोणतीही राजकिय पार्श्वभूमी व पद नसताना आपल्या अफाट अशा कार्याच्या जोरावर पंढरीच्या सुपुत्राची ही घोडदौड आहे. अनेक टु वकांच्या मनात आबासाहेब एकदा आमदार ही भावना निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. अनेकांच्या संकटाना धावून जाणाऱ्या आबांना आमदाराच्या रूपात पाहून उद्योजकाच्या दृष्टीतून पंढरपूरचा विकास करावयाचा आहे. हा विकास येथील जनतेला भावणार आहे. आबासाहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्याच्या खूप खुप शुभेच्छा 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)