पंढरपूर- स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, पंढरपूर व जैन ईरीगेशन सिस्टीम लिमिटेड, जळगाव व पोलीस किसान सहकारी संस्था मर्यादीत, पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वेरीच्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स हॉलमध्ये राज्यस्तरीय पोलीस किसान ८ हजार रू वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली.
दीपप्रज्वलनानंतर प्रास्तविकात पोलीस किसान ऊस मार्गदर्शक नानासाहेब कदम यांनी हा कृषी कार्यक्रम घेण्याचा उद्धेश सांगून ‘भारताला महासत्ता बनवायचे असल्यास कृषी क्षेत्रामध्ये अधिक योगदान देण्याची गरज असल्याचे सांगितले. या राज्यस्तरीय ऊस परिषदेच्या कार्यक्रमाचे उदघाटक वेनुनगर (गुरसाळे, ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत उर्फ आबासाहेब पाटील होते तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे होते. या वेळी ‘पोलीस किसान ‘गन्ना राजा’ एकरी ८ ते ११ हजार रुपये वार्षिक खर्चात एकरी ८० ते १०० टन ऊस उत्पादन नुसार जिल्ह्यातील डॉ बाहुबली खाने (जैनवाडी पंढरपुर) शुभम बागल (बाजीराव विहीर पंढरपूर), सतीश पाटील (पिंपळनेर, टेंभूर्णी), ज्योतिराम लोंढे (पिंपळनेर, टेंभूर्णी) व राहुल सावळे (सरकोली, पंढरपूर) या ५ शेतकऱ्यांना ‘पोलीस किसान ऊस रत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. यावेळी आंतरराष्ट्रीय ऊस संशोधक शास्त्रज्ञ प्रा डॉ. अमोल पाटील, अरण यांनी ८ हजार रू वार्षिक खर्चात एकरी शंभर टन ऊस उत्पादन यामध्ये ‘स्प्लिट फर्टिगेशन ऊस तंत्रज्ञान’ यावर प्रशिक्षण दिले.
जैन इरीगेशनचे रिजनल मैनेजर संतोष डांगे यांनी ‘ऊस उत्पादनासाठी जैन ईरीगेशन कडील उपलब्धता’ यावर बहुमोल माहिती दिली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता व स्वेरीचे डॉ. प्रशांत पवार यांनी ‘१०० टन ऊस उत्पादन साठी ‘ड्रोन फवारणी माहिती व ड्रोन फवारणी प्रात्यक्षिक’ करून दाखवले. ड्रोन चा वापर फवारणी साठी कसा केला जातो, यासाठी कोणती काळजी घ्यावी, फवारणीसाठी लागणाऱ्या औषधांचा वापर कसा करावा, यामुळे फायदा काय होतो यावर सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेचे सुत्रसंचालन पोलीस किसान ऊस मार्गदर्शक नानासाहेब कदम यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. रवी पवार, पोलीस किसान संस्थेचे चेअरमन राजाभाऊ पाटील व व्हाईस चेअरमन हणुमंतराव माने व इतर संचालक मंडळ यांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षण कार्यशाळेसाठी संभाजी भोसले, विठ्ठल रणदिवे, बाळासाहेब हाके, वाघे, पांडुरंग नाइकनवरे, कांतीलाल भाजपचे नितीन काळे तसेच कोल्हापूर, सातारा सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


