पंढरपुर : प्रतिनिधी : आज जागतिक योदा दिनाचे औचित्य साधुन पंढरीत कृष्णम् योगा आणि निसर्गोपचार केंद्र यांचे वतीने विविध ठिकाणी योगासनांचे आयोजन करत मोठ्या उत्साहाने योगा डे साजरा करण्यात आला. कृष्णम् योगा आणि निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका तथा पंढरीतील सुप्रसिध्द निसर्गोपचार व योग तज्ञ डॉ.सौ.रीना ज्ञानेश्वर अंकुशराव यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले. आजच्या धकाधकीच्या जीवनात योग साधना ही अतिशय अत्यावश्यक बनलेली असुन यासाठी शास्त्रशुध्द योगा चे प्रशिक्षण घेणेही गरजेचे आहे. आमच्या कृष्णम् योगा आणि निसर्गोपचार केंद्राद्वारे आम्ही शास्त्रशुध्द योगाचे प्रशिक्षण देण्यासोबतच विविध शारिरीक व्याधींना दुर ठेवण्यासाठी आहार व निसर्गोपचार याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन करत असतो. तसेच जागतीक योग दिनानिमित्त दरवर्षीच पंढरीतील वेगवेगळ्या ठिकाणी सामुहिक योगा चे आयोजन करतो. अशी माहिती यावेळी सौ.रीना अंकुशराव यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त महारुद्र गारमेंेट, महारुद्र स्पोर्टस्च्या संचालिका सौ, मेघा कुलकर्णी आणि महारुद्र गारमेंटच्या महिला कामगार भगिणींनाही यावेळी योगा चे महत्व सांगुन योग प्रशिक्षण देण्यात आले. त्याचप्रमाणे पंढरीतील चंद्रभागा वाळवंट, कोळे गल्ली, क्रांती चौक आदी भागासह विविध ठिकाणी योगा डे उत्साहात साजरा करंण्यात आला.
यावेळी डॉ.सौ.रीना अंकुशराव , मेधा कुलकर्णी, स्वाती क्षिरसागर, मनिषा पवार, लैला मुलाणी, सुरेखा साळुंखे, अश्विनी सलगर, सुवर्णा अंकुशराव, दिपाली कोरे, रुपाली संगीतराव, सोनाली कोताळकर, राधा तारापुरकर, भक्ती नातु, अंजली बारसावडे, सौ.वठाणे, वैदेही उत्पात, सौ.सोले, मंजुषा डोळे, भारती पाटील, मोना पाटील, सीमा काळे, सारिका शेळके, वर्षा लोखंडे, माधुरी सिधवाडकर, प्रतिक्षा पवार, भाग्यश्री परभणीकर, दिपाली राऊत, प्रियांका बेसुळके, शारदा देशमुख, धनश्री भिंके, स्वराली भिंके, सुरभि भिंके, रेशमा चव्हाण, उज्वला यादव अअदी महिला भगिणींची प्रमुख उपस्थिती होती.




