पंढरीत रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने मुलांना शालेय साहित्याचे किट वाटप...

0

पंढरपूर... दक्षिण काशी श्री क्षेत्र पंढरीतील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या रुक्मिणी प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब कुटुंबातील मुला मुलींना शालेय साहित्यांचे किट रुक्मिणी बँक,रुक्मिणी विद्यापीठ संचालक व सोलापूर जिल्हा युवक काँग्रेस आयचे अध्यक्ष सुनंजय (दादा) पवार यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.

 यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुनंजय (दादा) पवार म्हणाले की विद्यार्थी हा सर्वगुणसंपन्न असावा, मुलांनी पालकांच्या आज्ञेचे आचरण करून कुटुंबातील संस्कार मूल्य जोपासावीत असे सांगून बालपणापासून सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत शिस्तीचे पालन केल्यास अध्यात्म प्रगती जलद होऊन बुद्धी वाढ होते.पालकांनी लहानपणापासूनच मुलांवर शिस्तीचे संस्कार  रुजवण्याचे आवाहन केले.

यावेळी सुनंजय दादा पवार युवा मंचचे पदाधिकारी व रुक्मिणी प्रतिष्ठानचे श्याम साळुंखे, मयूर भुजंगे, बिपीन देवमारे, ऋषिकेश आगवणे ,पंकज थोरात इत्यादी बरोबर विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)