पंढरपूर क्रेडाई आयोजित कामगार नोंदणी व आरोग्य तपासणी मेळावा संपन्न

0


क्रेडाई पंढरपूरच्या वतीने जागतिक महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा:- * ६०० बांधकाम कामगारांचीं करण्यात आली नोंदणी:- 

पंढरपूर - १ मे "महाराष्ट्र दिन" तथा "जागतिक कामगार दिन" निमित्ताने बुधवारी १ मे रोजी बांधकाम व्यावसायिकांची सर्वोच्च संस्था क्रेडाई पंढरपूर व स्वयंसेवी संस्था दिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६०० बांधकाम कामगाराची नोंदणी करून घेण्यात आली. ज्या कामगारांचे कागदपत्र अपुरी राहिले आहेत किंवा अद्याप नोंद केली नाही त्यांना ७ मे पर्यंत कागदपत्र जमा करण्यास सांगण्यात आली.जरी कोणाचे रजिस्ट्रेशन राहिले असेल तर या आठवड्याभरात ७ मे पर्यंत लेबर रजिस्ट्रेशन चालू आहे याच्यासाठी श्री प्रणव मस्के मो.70208 96723 व श्री अंकित फत्तेपूरकर मो. 9422653685 यांच्याशी संपर्क करावा असे सांगण्यात आले. आजच्या या मेळाव्यात महिला वर्गाचा ही खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होता.

कामगार नोंदणीचे महत्त्व व त्यातील विविध सरकारी योजना,तसेच फायदे यांची माहिती  सहसचिव  श्रीसुतार यांनी सर्व कामगारांना दिली.
        डॉक्टर लिना घाडगे यांनी कामगारांना साइटवर घ्यावयाची काळजी व अपघात झाल्यास काय प्रथमोपचार करावेत याची माहिती दिली तसेच मोफत आरोग्य तपासणी केली. डॉक्टर अरुण मेनकुदळे यांनी त्वचा रोग संदर्भात माहिती दिली व तपासणी केली.  
          

सदर प्रसंगी जे के सिमेंट चे पंकज साखरकर, विवेक हजारे, रेवण पाटील व  प्रायोजक मोहक इंटरप्राईजेस चे मोहक गांधी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रेडाई अध्यक्ष अमित शिरगावकर, सचिव मिलिंद देशपांडे, उपाध्यक्ष आशिष शहा ,खजीनदार संतोष कचरे, सहसचिव शशिकांत सुतार, जनसंपर्क अधिकारी विवेक परदेशी व क्रेडाई पंढरपूरचे सदस्य , क्रेडाई वुमन्सविंग सदस्य व क्रेडाई युथविंग सदस्य यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)