(हुलजंती, तसेच मंगळवेढा शहरात इफ्तार पार्टी अयोजन करण्यात आले)
पंढरपूर प्रतिनिधी/- मंगळवेढा तालुक्यातील तालुक्याच्या वाटणीला आलेला दुष्काळ, शेतीमालाचा व दुधाचा कमी दर, हटवण्यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेली दुॅवा अल्ला कबूल करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नेते तथा श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला.
पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये सामाजिक कार्यात अभिजीत पाटील हे नेहमीच अग्रेसर राहिलेले दिसून येतात. सर्वधर्म समभाव हा त्यांच्या कार्याचा स्थायीभाव आहे, हे पुन्हा एकदा त्यांच्या या उपक्रमातून सिद्ध झाले. मंगळवेढा येथील गैबीपीर दर्गा परिसरामध्ये अभिजीत पाटील यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मतदार संघ अध्यक्ष मुज्जमील काझी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, शहराध्यक्ष चंद्रशेखर कौडूभैरी, संतोष रणदिवे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रा.येताळा भगत, शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, पंच गौस मुजावर, मुकद्दर मुजावर, अझर मुजावर, जावेद मुजावर, सादिक मुजावर, जमीर इनामदार, दामाजी माने, रज्जाक शेख, महादेव शिंदे, विठ्ठल कारखान्याचे संचालक सचिन वाघाटे, गणेश ननवरे, बाळासाहेब हाके, उमेश मोरे,धनाजी खरात, यासह मुस्लिम मौलाना व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




