सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी पंढरपूर येथे विठ्ठल चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा केला शुभारंभ...

0


पंढरपूर ( प्रतिनिधी) आज रामनवमीच्या निमित्ताने सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रचाराचा नारळ राम नवमीचे औचित्य साधून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन नामदेव पायरी येथे प्रचाराचा श्रीफळ अर्पण करून  केला. 
      यावेळी प्रणिती ताई शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे आशीर्वाद त्याचप्रमाणे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या स्वरूपात असलेले जनता जनार्दन यांच्या आशीर्वादाने मी खासदार होणार आणि सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी,कामगार ,बेरोजगार यांचे प्रश्न सोडवणार तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा जो विकास रखडला आहे. तो विकास पूर्णत्वास घेऊन जाणार सोलापूर जिल्ह्याला भेडसवणारा पाणी प्रश्न सोडवणार असून बेरोजगारांच्या हाताला एम आय डी सीच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचे काम हाती घेणार.
   आत्तापर्यंत सोलापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये विविध तालुक्यामधून माझा गाव भेटीचा दौरा हा सुरूआहे.त्या दौऱ्यामधून मला सर्वसामान्य जनतेमधून, वंचित, बहुजन समाज त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटना विविध जाती जमाती मधून मला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असून त्यांच्या आशीर्वादाने मी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
विजयी होणार असे त्यांनी सांगितले.
     प्रचाराचा या शुभारंभ प्रसंगी उपस्थित श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील,  प्रकाश पाटील,आदित्य फत्तेपुरकर,शिवसेनेचे साईनाथ अभंगराव,
संभाजी शिंदे,अमर सुर्यवंशी,सुनंजय पवार, नागेश गंगेकर, रवि अग्रवाल, समीर कोळी,पुनम अभंगराव,राजश्री लोळगे,पूर्वा पांढरे, स्वाती सुरवसे,राजुरकर,अशोक पाटोळे,संग्राम जाधव,राहुल पाटील, संदीप पाटील, गणेश माने, संदीप शिंदे, राजेंद्र भादुले, किरण घाडगे,शंकर सुरवसे, किशोर जाधव, फारुक बागवान, शाम साळुंखे,तसेच  विविध पक्षाचे कार्यकर्ते व नेते मंडळी आज उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)