कासेगाव सभेत भगिरथ भालके यांचा यल्गार...
प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार.....
पंढरपूर प्रतिनिधी ---कासेगाव तालुका पंढरपूर येथे सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे व कॉग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचार सभेत बोलताना युवा नेते, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन यांनी सभेला संबोधित करताना म्हणाले की पंढरपूर व मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ संघातून सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करण्याचा केला निर्धार.
कासेगावातील महामाया मंदिर पटांगणात माजी मंत्री आमदार सतेज पाटील, आमदार अमित देशमुख तसेच महाविकास आघाडीचे व कॉग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व कै.भारत भालके प्रेमी शेतकरी, कष्टकरी, महिला, युवा, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना भगिरथ भालके म्हणाले की प्रचाराच्या निमित्ताने आज ही सभा आयोजित केली आहे आमच्या ताईंनी कासेगावातल्या वडीलधाऱ्यांना नागरिकांना सांगितलं होतं की भगीरथला घेऊन आम्ही कासेगाव येथे मोठी सभा घेऊ आणि मोठ्या बहिणीने दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी छोटा भाऊ म्हणून त्या ठिकाणी माझ्यावरती आहे म्हणून मी सांगितलं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पहिली मोठी सभा कासेगाव नगरीत झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी सभा घेतली आहे. सर्वसामान्यशेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बेरोजगार तरुणांची विविध प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी तसेच लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, पंढरपूर मंगळवेढा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आपण खंबीरपणे आमदार प्रणिती शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहोत. येत्या ७ में रोजी मतदान रुपी आपण आशीर्वाद देऊन प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन भगिरथ भालके यांनी यावेळी केले.
या ठिकाणी आ. प्रणिती शिंदे या उमेदवार म्हणून आपल्या समोर आहेत मी जाहीर आवाहन करतो आपल्या सगळ्यांना काळाची गरज ओळखून कोणीही गट तट पक्ष यांचा विचार न करता सगळ्यानीं एक गोष्टी करायची ती म्हणजे प्रणिती शिंदे यांना मतदान करायचे आहे.

