गेल्या निवडणुकीत टाटा-कोयनेचे पाणी देतो असे उघड आश्वासन देणार्या भाजपाला मतदान करू नका -- वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम

0

पंढरपूर प्रतिनिधी -- गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत टाटा-कोयनेचे पाणी देतो असे उघड आश्वासन देणार्या भाजपाला मतदान करू नका असे आवाहन किसान आर्मीचे व वॉटर आर्मीचे, टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी आज पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत केले आहे.तसेच त्यांनी उजनी मायनस होण्याला भाजपचे दोन पालकमंत्री आणि काही आमदार जबाबदार असल्याचे आरोप केला त्यांनी आहे.

    पुढे माहिती देताना ते म्हणाले की,दि.,१७ एप्रिल २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अकलूजच्या प्रचार सभेत लाखो लोकांच्या समोर पंतप्रधानांच्या साक्षीने भाजपा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा- कोयनेचे पाणी दुष्काळ जनतेला देतो असे उघड आश्वासन दिले होते.तसे आश्वासन त्यांनी दि.१७ ऑक्टोबर २०१९ रोजी पुन्हा विधानसभा निवडणुकीच्या वेळी दौंडच्या सभेत दिले होते. आज पाच वर्षे झाली तरी त्यांनी यासाठी काहीही काम केलेले नाही. त्यांनी जर काम केलं असतं तर पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, नगर, सांगली सातारा बीड या सगळ्या जिल्ह्यातील जनतेला आज टंचाईकाळात पाणी मिळालं असतं. त्यांनी हा विषयच गांभीर्याने घेतला नाही. केवळ निवडणुकीपुरते त्यांनी आश्वासन देऊन जनतेची फसवणूक केली आहे. यासाठी आम्ही या पाण्याची शपथ घालून जनतेला भाजपा उमेदवारला मतदान करु नका म्हणून उघड प्रचार करणार असल्याचे किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते आणि टाटा-कोयना पाणी संघर्ष समितीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी जाहीर केले.

   माझ्या सततच्या आंदोलनानंतर आणि माझ्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने दि. २ऑगस्ट २०१८ रोजी 'हे पाणी आमचं या माझ्या पुस्तकाच्या आधारे शासन निर्णय पारित केला आहे. या शासन निर्णयाच्या आधारे भाजपा सरकारकडून जनतेला आश्वासन देण्यात आले होते तथापि पाच वर्षे होऊनही यावर शासनाने काहीच काम केले नाही, केवळ निवडणुकीच्या प्रचारासाठी माझ्या विषयांचा वापर केलेला आहे. ही बाब गंभीर आहे. सदर शासन निर्णय प्रफुल्ल कदम यांनी विठ्ठलाच्या नामदेव पायरीवर अर्पण केला आहे.आज उजनी मायनस होण्याचे कारण सुद्धा भाजपचे दोन आमदार याला जबाबदार असल्याचा उघड आरोप त्यांनी केला आहे.

टाटा- कोयनेचे तब्बल ११६ टीएमसी समुद्राला वाहून जाणारे स्वच्छ व शुद्ध पाणी हे महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, बारामती, सातारा, सांगली, माढा, सोलापूर, उस्मानाबाद, नगर, बीड या सर्व लोकसभा मतदार

संघातील हक्काचे पाणी आहे.टाटांच्या सहा धरणातील ४८.९७ टीएमसी पाणी हे थेट उजनी धरणात येणारे पाणी आहे तर कोयनेचे ६७.५ टीएमसी अवजल हे टेंभू, म्हैशाळ, उरमोडी, जिहें कटापूर आदी सर्व उपसा सिंचन प्रकल्पातून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांना मिळू शकणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)