श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार

0

 


पंढरपूर - श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेच्या विद्यार्थ्यांचा बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात वुशू या क्रीडा प्रकारात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल आपल्या प्रशालेतील कु.ईश्वरी दिलीप चव्हाण, प्रणोती राजेंद्र चव्हाण (10 वी ब) व श्रेयश गणेश कदम (8 वी अ) या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया स्पोर्ट्स डायमंड अवॉर्ड यांचेवतीने प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले 

प्रित्यर्थ प्रशालेतर्फेही आज त्यांचा पुष्पगुच्छ,शाल,श्रीफळ देऊन प्रशालेचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे व पर्यवेक्षक रणजित शिनगारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी वरिष्ठ



लिपीक राजकुमार ढगे,प्रतिष्ठित ग्रामस्थ व प्रशालेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते._

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)