गोपाळपूर येथे ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन व विविध विकास कामाचे भुमिपूजन

0

मा.प्रशांत परिचारक आणि राजु खरे यांचे शुभहस्ते होणार ग्राम सचिवालय इमारतीचे भूमिपूजन

पंढरपूर / प्रतिनीधी   - पंढरपूर शहरालगत असलेल्या गोपाळपूर याठिकाणी नव्याने बांधण्यात येत असलेल्या ग्रामसचिवालयचे इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम शनिवार दि २ मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती ग्रामपंचायतचे वतीने देण्यात आली आहे.

पंढरपूर येथे होत असलेल्या यात्रा आणि त्याचा गोपाळपूर याठिकाणी होत असलेला मोठा प्रभाव. यामुळे याठिकाणी मोठी इमारत असणे आवश्यक होते. याबाबत मोहोळ विधासभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार उद्योजक राजू खरे यांनी मोठा पाठपुरावा करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि आ. भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. या इमारतीचे भूमिपूजन उद्योजक राजू खरे आणि आ. प्रशांतराव परिचारक यांचे हस्ते होणार आहे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ. समाधान आवताडे आणि विठ्ठल सह साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके भूषविणार आहेत.

या कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जि.प चे अतिरिक्त सी ई ओ संदीप कोहिनकर, सां बा. विभागाचे कार्यकारी अभियंता निमकर, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वरीचे संस्थापक सचिव डॉ. बी पी रोंगे, पांडुरंग कारखान्याचे माजी चेअरमन दिनकर मोरे, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरिशदादा गायकवाड, पंढरपूर नगरपालिका माजी नगराध्यक्ष वामनतात्या बंदपटे, बाजार समितीचे उप सभापती राजूबापू गावडे, जिल्हा परिषद अधिकारी इशाधीन शेळकांदे, श्रीमती स्मिता पाटील, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, युवा नेते प्रणव परिचारक, गोपाळपूर तंटामुक्त समिती अध्यक्ष शिवाजी आसबे, उप अभियंता लवटे, मिटकरी, पवार, दौंडचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे, पंढरपूरचे गटविकास अधिकारी आनंद मिरगणे, शाखा अभियंता लोटके, आदीसह अनेक मान्यवर आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. वरील कार्यक्रमासाठी शनिवारी सायंकाळी साडे पाच वाजता सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच विलास मस्के आणि ग्रामसेविका श्रीमती ज्योती पाटील यांनी केले आहे.

मा. प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच विलास मस्के यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक कामे केली आहे. अत्यंत सरळ व सर्व सामान्यातील सरपंच म्हणून आपला नावलौकिक मिळविला आहे. अनेक कामे मार्गी लागली आहेत. गोपाळपूर येथील श्रीकृष्ण मंदीर यांना वेळोवेळी शासकीय योजनातून आर्थिक मदत केली आहे.

रस्त्यासाठी दीड कोटीचां आणला निधी

उद्योजक राजू खरे हे मोहोळ मधून निवडणूक लढविणार आहेत. मात्र गोपाळपूर याठिकाणी त्यांचे मोठे फार्महाऊस आहे त्यामुळे गोपाळपूर ग्रामस्थ यांचेकडून या भागातील रस्ते आणि विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी खरे यांचेकडे मागणी करत असतात. यामुळे खरे यांनीही या ग्रामसचिवालय ईमारतीसह भागातील पंढरपूर मंगळवेढा या रस्त्यापासून स्वेरी कॉलेज पर्यंतच्या रस्त्यासाठीही दीड कोटीचा निधी मंजूर करून दिला आहे. याची कामे लवकरच सुरुवात करण्यात येणार आहेत. खरे यांनी मोहोळ मतदार संघासाठी निधी देत असताना पंढरपूर भागाला विविध कामासाठी मोठा निधी मिळविला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)