यावेळी राजु खरे यांनी गोपाळपूर या गावाबद्दल मला खुप आस्था आहे. मी सध्या जरी मुंबई येथे असलो तरी माझी कर्मभुमी ही गोपाळपूरच आहे. माझे लहान पण गोपाळपूरात गेले आहे. त्यामुळे माझा ओढा गोपाळपूर कडे आहे. सध्या मी मोहोळ येथुन विधानसभा लढविण्याच्या तयारीत आहे. पंढरपूर तालुक्यातील सतरा गावे या मतदार संघाला जोडलेली आहेत. या गावातील मतदारांच्या गाठीभेटी अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. पण याही विषयापेक्षा आपल्या परिसरातील अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न मी करीत आहे. ग्रामीण भागातील अनेक शाळांना मी मदत केली आहे. मी शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक असल्यामुळे मला पदापेक्षा लोकांची सेवा करण्याची आवड आहे. जेथे अन्याय होतो तेथे स्वत: जाऊन अन्यायग्रस्थाला मदत करतो.
गेल्या आषाढीच्या वेळेस मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गोपाळपूर येथे तुमचा सत्कारसाठी थांबलो आहे असे सांगितले मी व गोपाळपूरातील अनेक सदस्य तुमचा सत्कार करणार आहे तो स्विकारावा ही विनंती केली व त्यांनी येथे थांबण्याचे कबुल केले.त्या सत्कारावेळी गोपाळपूर तीर्थक्षेत्राचे महत्व त्यांना पटवून दिले, पंढरपूरला येणारा प्रत्येक वारकरी भाविक गोपाळपूरला येतोच,सर्व संताच्या पालख्या या गोपाळपूरला येऊन गोपाळपूरचा काला घेतल्या शिवाय पुढे मार्गस्थ होत नाहीत,गोपाळपूरला आल्याशिवाय त्यांची वारीच पुर्ण होत नाही. हाच धागा पकडून त्यांना गोपाळपूरला एक भव्य अशी ग्रामसचिवालयाची वास्तु व्हावी व येथील सर्व कामकाज एका ठिकाणी चालावे त्यासाठी तुम्ही या गावाला विशेेष निधी मिळवून द्यावा असे सांगितले, मुख्यमंत्र्याना येथील तीर्थक्षेत्राचे महत्व कळल्यामुळे व अनेक भाविकांची सोय होते म्हटल्यावर त्यांनी ताबडतोब एक कोटीचा निधी मंजूर केला पण माझे समाधान पुर्ण झाले नाही कारण या ऑफीसमध्ये लागणारे फर्निचर व इतर साहित्यासाठी आणखी काही निधी लागणार होता.म्हणून मी वाढीव निधीची मागणी केली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा पंचेचाळीस लाखाचा निधी मंजूर केला,नुसता मंजूर केला नाहीतर त्यांनी वर्क ऑर्डरही काढली.नुसते कागदावर आकडे असून चालत नाही तो मंजूर होऊन ऑर्डर निघाल्या पाहिजेत.हे माझे मत असते.
निधी आणण्यासाठी नगरसेवक,आमदार,खासदार या कुठल्याही पदाची गरज नसते त्यासाठी आपली मानसिकता व आत्मविश्वास लागतो तो माझ्याकडे आहे त्यामुळेच मी हे काम करू शकलो. तसेच गोपाळपूर येथील स्वेरी कॉलेजला जाणार्या रस्त्यासाठी 1.5 कोटी निधी मंजूर करून घेतला. या कॉलेज मध्ये अनेक विद्यार्थी येजा करत असतात हा रस्ताही अरूंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची ताराबंळ होते हे लक्षात घेऊन हा रस्ता व रस्त्यावरील दोन पुल करण्याचे नियोजन केले व ती मार्गस्थही झाली. अशी अनेक कामे मी केलीही आहेत.
या ग्रामसचिवालयाची वास्तु जेवढी देखणी, व सर्व सोयी सुविधा केल्या जाणार आहेत. रस्त्याने येता जाताना ही वास्तु बघितल्यावर संपुर्ण तालुक्यातील लोक गोपाळपूर ग्रामपंचातीचे नाव घेतील अशी सुंदर वास्तु करणार ही माझी इच्छा आहे.
सदर प्रसंगी दिलीप भाऊ गुरव यांनी गोपाळपूर येथील तीर्थक्षेत्राचे महत्व पटवून दिले. मा.प्रशांतराव परिचारक यांनी वेळोवेळी ग्रामपंचयातीसाठी मदत केली आहे. स्व.सुधाकरपंत व स्व.भारतनाना भालके यांनी गावाच्या विकासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून अनेक कामे मंजूर केली होती. व त्यांचा फायदा भाविक व ग्रामस्थांना खुप झालेला आहे.
या कार्यक्रमासाठी उपस्थिती म्हणून युवा नेते प्रणव परिचारक, जि.प.सदस्य वसंतराव देशमुख, सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे, स्वेरीचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे, भगिरथ भालके, पांडुरंगचे मा.चेअरमन दिनकर मोरे, कृषी उत्पन्न बा.समितीचे सभापती हरीषदादा गायकवाड,मा.नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे, बा.समितीचे उपसभापती राजुबापू गावडे,तज्ञ संचालक दिलीपभाऊ गुरव, अर्बनचे संचालक रा.पा.कटेकर, भारूडकार चंदाताई तिवाडी, माऊली हळणवर,अर्जुन जाधव, महादेव सुर्यवंशी,सुभाष हुंगे पाटील,नितीन शेळके, प्रकाश पारवे,उमाकांत करंडे,विजय खरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.




