पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानेच मी सोलापूर लोकसभा मतदार संघांमध्ये भरघोस मताने विजयी होणार - राम सातपुते

0


पंढरपूर -  सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते आज पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी  दर्शनासाठी आले असता त्यांनी पत्रकाराची संवाद साधताना म्हणाले की आज मी पंढरपूर येथे पांडुरंगाचे व रुक्मिणीचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे मला पक्षाने अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर प्रथमच मी पंढरपूर रेथे आलो आहे मी पांडुरंगा समोर नतमस्तक होऊन माझ्याकडून समाजाची व देशाची सेवा घडो अशी इच्छा व्रक्त केली आहे. पांडुरंगाचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्यानेच मी सोलापूर लोकसभा मतदार संघांमध्ये भरघोस मताने विजयी होणार असा मला विश्‍वास आहे असे ते म्हणाले.

   पत्रकाराने विचारलेल्रा प्रश्‍नांना उत्तर देताना मी जनतेच्या भावनेचा विचार व जनतेच्या कल्याणासाठी व विकासासाठी प्रयत्न करणार नेता आहे. मी माझ्या मतदारसंघांमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत तसेच मला भारतीय जनता पार्टीने सोलापूर लोकसभा मतदारसंघ अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की पुढील काळात विविध विकास कामे मोठ्या प्रमाणात होताना आपणास दिसून येतील. तसेच मागील दहा वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही खासदारांनी केलेल्या विकास कामे तसेच भारतीय जनता पार्टीचे आजी-माजी आमदार कार्यकर्ते सहकारी मित्र पक्ष महाविकास आघाडीचे सर्व नेते यांच्या सर्वांच्या सहकार्‍रांनी माझा विजय निश्‍चित असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. येत्या काळातच पंढरपूर विभागातील विविध विकास कामासाठी मी प्रयत्नशील आहे रस्ते, रेल्वे, उद्योग, व्यवसाय तसेच केंद्रीय पर्यटन यादीमध्ये पंढरपूर तीर्थक्षेत्राचे नाव घेण्यासाठी मी प्रयत्न करेन. जनतेच्या विकास कामासाठी मला जनतेचा आशीर्वाद नक्कीच लाभेल. 

  सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी माझे संपूर्ण योगदान असणार आहे.सोलापूरलोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यास सोलापूर जिल्ह्याचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही असे यावेळी ते म्हणाले.मी भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात  मी तीन लाखापेक्षा जास्त मताने निवडून येईन यांची मला खात्री आहे. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून केंद्रीय पर्यटन सुचीमध्ये जावे पंढरपूर भारतातच नव्हे तर जगाच्या नकाशावर मीयावे यासाठी प्रयत्न करणार आहे. पंढरपूर वासीयांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा पांडुरंग मंदीराबाबत व शहर व तालुका बाबात आहेत. त्या पुर्ण करण्याच्या प्रामाणिक प्रयत्न करेन, महायुतीतील सर्व घटक माझ्या सोबत आहेत त्यामुळे मी पुर्ण ताकतीने निवडून येणार आहे.

 सर्व सामान्य उमेदवार म्हणून मी निवडून येणार आहे. गेल्या ७५ वर्षात जो विकास झाला नाही तो गेल्या दहा वर्षात झाला आहे. सर्वसामान्याच्या योजना कागदावर नाही तर त्या सर्व सामान्य यांच्या प्रयत्न  पोहोचवल्या आहेत. त्यामुळे माझा विजय निश्‍चित आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)