समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य आणि सामाजिक भान ठेवून येथील मर्दा परिवाराने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. 'रक्तदान हेच श्रेष्ठदान' या घोषवाक्यास अनुसरून आयोजित पंढरपूर ब्लड सेंटर, उमा कॉलेज जवळ, कराड नाका येथे रविवार दिनांक १७ मार्च, २०२४ रोजी सकाळी १०:०० ते दुपारी ०४:०० वाजेपर्यंत रक्तदान शिबिरामध्ये पंढरपूर आणि परिसरातील इच्छुक रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. असे आवाहन पंढरपूर ब्लड सेंटर आणि मर्दा परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व. डॉक्टर संदीप मर्दा यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ रक्तदान शिबिराचे आयोजन
मार्च १३, २०२४
0
पंढरपूर :- येथील स्वर्गीय डॉक्टर संदीप सुभाष मर्दा यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ मर्दा परिवार आणि पंढरपूर ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
Tags


