पंढरपूर प्रतिनिधी -- श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूरच्या वतीने उद्योजकता प्रशिक्षण व कर्ज सहाय्य कार्यशाळा पार पडली .या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून श्री जावेद आतार पश्चिम विभाग प्रमुख सूक्ष्म लघुउद्योमिता विकास भारत सरकार व योगेश वाघ जिल्हा समन्वयक अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे उपस्थित होते .श्री रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिक सचिवा सुनेत्राताई विजयसिंह पवार यांचे अध्यक्षतेखाली हा मेळावा अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर इसबावी च्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात पार पडला.कार्यशाळेत उस्फुर्त प्रतिसाद लाभला या प्रसंगी बोलताना योगेश वाघ म्हणाले श्री अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने 15 लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते. यावरील नियमित कर्ज फेड असल्यास सात वर्षाचे व्याज महामंडळ भरते. या योजनेची सविस्तर माहिती त्यांनी दिली .
प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून फाईल सादर केल्यावर पुढील प्रोसेस केली जाते. आयटी रिटर्न सर्वांनी काढून घ्यावेत तो एक आर्थिक आरसा आहे असे ते म्हणाले . जावेद आतार यांनी केंद्र शासनाच्या अनेक योजनांची सविस्तर माहिती दिली .त्यांनी तुमचे जे उत्पादन आहे ते खूप महत्त्वाचे आहे, त्याचा दर्जा जर उत्तम असेल तर बाजारपेठ चालून येईल. जगाच्या अनेक देशांमध्ये उत्पादन पाठविण्याची जबाबदारी आम्ही घेतो रुक्मिणी विद्यापीठाशी लवकरच करार करणार असल्याचे व त्याचा फायदा महिलांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात सुनेत्राताई पवार म्हणाल्या , व्यवसाय करणार्या युवक व महिला यांना सर्वतोपरी सहकार्य करू आपल्या परिसरातून उद्योजक घडावेत हाच या कार्यशाळेचा उद्देश आहे. रुक्मिणी विद्यापीठ उद्योजक महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील आम्ही महिलांची व बचत गटाची उत्पादने व तयार उत्पादनास रुक्मिणी विद्यापीठ लवकरच करार करू .
या कार्यक्रमात मीनलताई पाटील रुक्मिणी बँकेचे चेअरमन सौ सविता लोखंडे ,संचालक रवींद्र साळुंखे मामा, नवनाथ तांबवे जयश्री खडतरे , आधटराव . सुहास भाळवणकर , संतोष कवडे, बाळासाहेब चौगुले , पांडुरंग चव्हाण , काशिनाथ गोगाव बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते. सूत्रसंचालन आलनदीप टापरे तर आभार सुसेन गरड यांनी मानले.


