पंढरपूर - श्री. विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक महिला दिना निमित्त प्रसिद्ध लेखिका सौ. आशा आरुण पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.स्कूलच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अशा अरुण पाटील यांचा परिचय करून देण्यात आला.त्यांचा जन्म १९७६ मध्ये झाला.त्याचप्रमाणे त्या सध्या शिक्षिका म्हणून " आदर्श बाल व प्राथमिक विदया मंदिर कवठेकर प्रशाला पंढरपूर " येथे कार्यरत आहेत. तरी त्यांचे आठवणीचा पाऊस ‚ बिल्वदल‚हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.त्याचबरोबर अमृतफळ,आत्मनाद,बंटीची फजिती‚शूरवीर,पाखरं,शेवंताबाई इत्यादी त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत.त्याचप्रमाणे त्यांची १६ पुस्तके प्रसिद्ध आहेत.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक आमिर इनामदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व महिला शिक्षिकांनी परिश्रम घेतले. जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेचे संस्थापक सचिव.डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम.बागल उपाध्यक्ष बी.डी.रोंगे खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.




