सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंजयदादा पवार जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या संकल्पनेतून श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर यांच्या वतीने मोफत उद्योजकता प्रशिक्षण

0

पंढरपूर प्रतिनिधी - नव उद्योजक होण्याची इच्छा असणार्यासाठी पंढरपूर येथे श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर यांच्या वतीने मोफत उद्योजकता प्रशिक्षण व कर्जसहाय्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे अशी माहिती  कॉग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष सुनंजय पवार यांनी दिली आहे.

   सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनंजयदादा पवार जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस यांच्या संकल्पनेतून श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर यांच्या वतीने मोफत उद्योजकता प्रशिक्षण व कर्जसहाय्य कार्यशाळेचे आयोजन दिनांक 27 फेब्रुवारी 2024 वार मंगळवार रोजी सकाळी ठीक  11 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृह अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर इसबावी पंढरपूर ( रुक्मिणी शाळा) येथे केले आहे.

    बेरोजगारी हा आपल्या सर्वापुढील व समाजापुढील मोठा प्रश्‍न आहे, त्यावर उद्योजक होणे हेच उत्तर आहे. तरी श्री रुक्मिणी विद्यापीठ जाणीव जागृती मेळावे, बचत गट मार्गदर्शन शिबिरे, विविध चर्चा सत्रे, याच्या माध्यमातून हे सामाजिक कार्य करत आलेले आहे. तरी संस्थेच्या वतीने मा सुनेत्राताई पवार सो यांच्या अध्यक्षतेखाली व मा जावेद आत्तार सो विभागीय आयुक्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजकता प्रशिक्षण व कर्जसहाय्य या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये व्यवसाय कसा. करावा, व्यवसाय निवड व बाजार संधी, विविध उद्योग संधी व मार्गदर्शन, सध्या करण्यायोग्य विविध व्यवसाय, भांडवल व उद्योग उभारणी, मार्केटिंग तंत्र, प्रकल्प अहवाल बनवण्याबाबत मार्गदर्शन, बैंक लोनची संपूर्ण माहिती, कृषी प्रक्रिया उद्योग संधी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, शासनाच्या विविध कर्ज योजना व अनुदान विषयी माहिती, उद्योग व कार्यालयीन मार्गदर्शन विविध कार्यालयाची ओळख इत्यादी, स्टार्टअप बिझनेस करता मार्गदर्शन, व्यवसाय दहा पतीने कसा , प्रश्‍नोत्तरे व शंका, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, मुद्रा योजनांची माहिती, तसेच महिला, मागासवर्गीय व सर्व नागरिकाना कर्ज योजना. शेळीपालन, वराह पालन, कुक्कुटपालन यासाठी मिळणारे अनुदान व प्रोजेक्ट या व इतर बाबीवर कार्यशाळेत मार्गदर्शन होईल. तरी शहरातील तसेच परिसरातील जास्तीत जास्त महिला व तरुणांनी कार्यशाळेचा लाभ घ्यावा असे आवाहन  सुनंजयदादा पवार यांनी केले आहे.तसेच अधिक माहितीसाठी  काशिनाथ गोगाव 8856830303 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)