आरोग्य शिबिर घेणे काळाची गरज. कार्यकारी संचालक डी आर गायकवाड........

0


पंढरपूर - सध्याच्या धकाधकीच्या युगात माणूस स्वतःकडे लक्ष न देता काम करत आहे स्वतःच्या प्रकृतीकडे लक्ष न देता आपापल्या उद्योगाकडे धावत आहे तर साखर कारखान्यातील ऊसतोड मजूर हे स्वस्वास्याकडे लक्ष न देता काम करीत आहेत हे ऊसतोड मजूर अतिशय गरीब कुटुंबातील असल्याने त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणी होणे गरजेचे आहे व त्यांना योग्य असा उपचार मिळणे महत्त्वाचे आहे तर अशी आरोग्य शिबिरे भरविणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डीआर गायकवाड यांनी काढले ते कारखान्यातील ऊसतोड मजुरांच्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते तर अशी शिबिरे कारखान्याचे कर्तव्यदक्ष चेअरमन अभीजीत पाटील हे नेहमी घेत असतात त्यांच्या आदर्शानेच आम्ही कामकाज करत असतो.                         

सदर शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे संचालक विठ्ठल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेबर ऑफिसर यांनी केले यावेळी शिबिरासाठी डॉक्टर अनिरुद्ध नाईक नवरे प्राथमिक आरोग्य केंद्र भोसे तसेच डॉक्टर सचिन देवकते आरोग्य अधिकारी मेंढापूर डॉक्टर सचिन गुटाळ समुदाय आरोग्य अधिकारी गुरसाळे तसेच रामदेव काळे टेक्निशन रोपळे तसेच गुरसाळेच्या आरोग्यसेविका आरपी वाडकर आरोग्य सेवक के एस इंगळे यांच्यासह आशा वर्कर उपस्थित होत्या यावेळी कारखान्याचे ऑफिस सुपरिटेंड आबासाहेब कथले कारखान्याचे ऊस पुरवठा अधिकारी शामराव शिंदे ऊस विकास चे उद्धव बागल ॲग्री ओव्हरसीयर हरिभाऊ गायकवाड ज्ञानेश्वर घाडगे समाधान भुसनर द्रोणाचार्य हाके डिसलरी मॅनेजर सोळंकी सुरक्षा अधिकारी सुर्वे चव्हाण व बैलगाडी विभागातील सर्व स्टाफ हजर होता तर या कार्यक्रमासाठी ऊस तोडणी ठेकेदार मजूर बहुसंख्येने उपस्थित होते सदर शिबिरामध्ये क्षयरोग बीपी शुगर यासह अनेक तपासण्या व औषधोपचार करण्यात आले. सदर शिबिरामुळे ऊसतोड मजुरांमध्ये आनंद दिसून आला

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याचे लेबर ऑफिसर यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)