पंढरपूर.... शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिकतेचे ज्ञान देऊन सर्व गुण संपन्नतेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे या उद्देशाने सतत कार्यरत राहणाऱ्या श्री. रुक्मिणी विद्यापीठाच्या संस्थापिका - सचिवा सुनेत्राताई पवार यांचे कुशल मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मातोश्री ईश्वराम्मा विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पंढरपूरचे वार्षिक स्नेहसंमेलनाची सुरुवात पंढरपूर शहर निर्भयपथकाचे श्री. काळे यांचे शुभ हस्ते स्टेज पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली .
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. काळे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिकता तपासून व आत्मपरीक्षण करून स्वतःचे छंद जोपासावेत. विविध कौशल्याच्या जोरावर आपली विविध क्षेत्रात सिद्धता सिद्ध करण्याचे आवाहन करुन शालेय मुलींनी काही तक्रार असल्यास १०० किंवा ११२ नंबरला संपर्क करून मुलींनी धाडसाने तक्रारी नोंदविल्यास निर्भय पथक आपणास तात्काळ मदत करेल असे सांगितले.
तर प्राचार्या सौ. नंदिनी गायकवाड म्हणाल्या की विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने प्रशाला आमचे ममत्व असणाऱ्या सुनेत्राताई पवार यांचे मार्गदर्शनाने कला, क्रीडा व बौद्धिक,अध्यात्मिक क्षेत्रात मुलांचे साठी ज्ञानार्जनाचे कार्य आम्ही करत आहोत. शैक्षणिक मूल्याबरोबर अध्यात्माच्या समन्वयातून सर्वोत्कृष्ट शिस्तप्रिय विद्यार्थी घडविणे हा आमचा व संस्थेचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.विविध कला गुणदर्शनात वैयक्तिक ,सामूहिक नृत्य, नकला ,एकपात्री नाटक, लावणी, भारुड ,गवळण, पोवाडा ,व दक्षिणात्य नृत्य सादर करून प्रेक्षकांना सतत खेळवत ठेवले. या कार्यक्रमासाठी प्राथमिक विभाग मुख्याध्यापक संतोष कवडे , काशिनाथ गोगाव यांचे सह मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख विभावरी डुबल व सविता लोखंडे यांनी केले .
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी माधुरी बोडके, फरहाणा कादरी, कुमुदिनी सरदार, गणेश डुबल, कल्याणी कांबळे, विजय भंडारे, अभिजीत कोष्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.




