पंढरपूर प्रतिनिधी-- पंढरपूर येथील जेष्ठ पत्रकार रामचंद्र सरवदे यांची पत्रकार सुरक्षा समितीच्या कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल त्याचा सत्कार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे यांचे हस्ते करण्यात आला.
या निवडीबद्दल पंढरपूरातील सर्वच पत्रकार बांधवानी अभिनंदन केले. अगदी प्रतिकुल परिस्थितीतून साप्ताहीकांच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजीक,राजकीय,पत्रकार याच्याशी संपर्क ठेवून पत्रकारीतितेतील कार्य अखंडपणे चालू ठेवले. गेली 8 वर्ष पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार यांचे मार्गदर्शनातून पंढरपूरात समितीची स्थापना केली पत्रकार सुरक्षा समितीतर्फे अनेक सामाजीक उपक्रम घेऊन पत्रकार सुरक्षा समितीचे कार्य अखंडपणे चालू ठेवले.अगदी शहरातील व ग्रामीण भागातील नवीन पत्रकारांना यात सामील करून वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून संघटेनेत सामील करून घेतले आहे.
सदरप्रसंगी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत माळवदे, पंढरपूर शहराध्यक्ष दत्ता पाटील, प्रसिद्ध प्रमुख रामकृष्ण बिडकर, विनोद पोतदार आदि पत्रकार उपस्थित होते. यावेळी रामचंद्र सरवदे म्हणाले की पत्रकार सुरक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष यशवंत पवार रांनी माझ्यावर वर कार्यकारी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ती मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या सहकार्याने निश्चितपणे पार पाडेन. तसेच पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन. यावेळी आभार विनोद पोतदार यांनी मानले.



