पंढरपूर- पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील तीनशे हुन अधिक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या हप्त्यापासून वंचित होते. मात्र माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी याबाबत प्रशासनाला दिलेल्या सूचनेनंतर त्यांना प्रथमच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पीएम किसान ही देशातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची योजना आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने या योजनेची सुरूवात केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजाराचा लाभ मिळतो. तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार असे सहा हजार रूपयाचे वितरण केले जाते. दर चार महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यवार हे पैसे जमा होतात.
मात्र पंढरपूर तालुक्यातील शिरढोण येथील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता काही कारणास्तव मिळत नसल्याचे तेथील भारतीय जनता पार्टीचे ओबीसी सेलचे अध्यक्ष जयसिंग भुसनर, उपाध्यक्ष विजय व गावातील शेतकऱ्यांनी मा.आ.प्रशांत परिचारक यांना निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने तहसिलदार व कृषी अधिकारी यांना मा.आ.प्रशांत परिचारक यांनी समक्ष भेटून हा प्रश्न मार्गी लावण्यास सांगितले. त्यावेळी असे निदर्शनास आले की शेतकऱ्यांचे आधारकार्ड लिंक व केवायसी अपुर्ण असले कारणाने पीएम किसान योजनेचा हप्त्यापासून शेतकरी वंचीत राहिले अशी माहिती मिळाली. त्यांनतर शिरढोण येथे शिबीर घेऊन आधारकार्ड लिंक व केवायसी पुर्ण करण्याचे काम करण्यात आले. परंतु आधारकार्ड लिंक व केवायसी पुर्ण करूनही शेतकऱ्यांना पुढील हप्ता मिळालेला नाही. पीएम किसान योजनेचे काम महसूल विभाग पाहत होता ते काम कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आले व कृषी विभागाकडे माहिती घेतली असता महसूल विभागाने शिरढोण येथील शेतकरी हे इनॲक्टीव यादीमध्ये समाविष्ट केले असल्याचे समजले.
तसेच मा.जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी लेखी निवेदन देऊन हप्ता मिळाला नाहीतर उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब व मा.जिल्हाधिकारी साहेब यांना लेखी निवेदन देऊन वंचीत शेतकऱ्यांना लवकरात लवकर हप्ता मिळावा अशी मागणी पत्राद्वारे केली होती.
याची दखल घेऊन तातडीने शिरढोण व सोलापूर जिल्ह्यातील पीएम किसान योजनेपासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांना ॲक्टिव यादीत समाविष्ट केले गेलेले आहेत. त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर हप्ता जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
तसेच पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील पीएम किसान योजनेपासून वंचीत राहिलेल्या शेतकऱ्यांनी माझ्यासंपर्ककार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केले आहे.


