शिक्षकांना घरांसाठी मुंबईत जागा देऊ..प्रवीण दरेकर --- सेकंडरी पतसंस्थेच्या आदर्श पुरस्काराचे वितरण

0



मुंबई - "जेव्हा जेव्हा सभागृहात सहकारावर टीका होते त्या त्यावेळी मी सहकार टिकले पाहिजे यावर बोलत असतो.काही पाच टक्के सोडले तर प्रामाणिक पगारदार नोकरदारांची गरज सहकाराला असते म्हणून शिक्षकांना जेवढया सुविधा देता येतील तेवढया देण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू असे प्रतिपादन मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केले.सेकंडरी पतसंस्था मुंबई यांच्या सर्व शाखेतील सभासदांचा राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी परळ येथील राष्ट्रीय मजदूर मिल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.राज्यातील शिक्षक त्यांच्या समस्या यावर सर्वाधिक वेळ चर्चा सभागृहात केली जाते, त्यामुळं जुनी पेन्शन हा मुद्दा मला माहिती आहे यावर लवकरच देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साहित्यिक प्रवीण दवणे आणि आमदार प्रसाद लाड उपस्थित होते.कार्यक्रम प्रमुख संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी पस्तीस हजार सभासद,दोन हजार कोटींचा व्यवसाय,याद्वारे सभासदांना केला जाणारा कर्जपुरवठा, ठेवी,सेवा-सुविधा याबाबत मुंबई बँकेच्या रूपाने प्रवीण दरेकर साहेब यांचा सतत मोलाचा आधार मिळत असून शिक्षक बांधवांसाठी जागा मिळण्याची मागणी केली.उद्योजक आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या मनोगतात सेवा क्षेत्रात कसे नियोजन करून कर्मचारी सभासद यांचे हित जोपासता येते यावर मार्गदर्शन केले.साहित्यिक प्रवीण दवणे म्हणाले,"मुलांना एकाग्र बनवणे हेच ध्येय ठेवून कार्य केले पाहिजे,ज्यावेळी विद्यार्थी रस्त्यात भेटून आदराने नमस्कार करतात तोच खरा पुरस्कार असतो!"

यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षक मनोगतात पंढरपूर येथील कलाशिक्षक अमोल कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांची वर्णी विधान परिषदेवर लागावी तसेच शाळकरी मुले व सभासदांच्या कुटुंबाला मुंबई,नागपूर मध्ये माफक दरात राहण्याची सोय केली जावी याबाबत विनंती केली.

सदर कार्यक्रमास उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे,मानद सचिव किशोर पाटील,सहसचिव सतीश माने,खजिनदार सतेश शिंदे संचालक प्रमोद देशमुख,सचिन नलावडे,आदींसह सर्व संचालक मंडळ राज्यभरातून आलेले शिक्षक,सभासद,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सभासदांचा सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार सचिन नलावडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)